Tarun Bharat

‘विनामूल्य’ आश्वासने हा केजरीवालांचा डाव

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सध्या चीन आणि तैवानमध्ये तणावग्रस्त वातावरण निर्माण झालेले आहे. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात युद्ध सराव करण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे जगभरातच तणाव निर्माण झाला असून तो त्वरित कमी करण्यासाठी दोन्ही देशांनी पावले उचलावीत, असे आवाहन भारताकडून करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या कनि÷ लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली होती. या भेटीला चीनने कडाडून विरोध केला होता. तसेच ही भेट दोन्ही देशांमधील संबंध बिघडविण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, असा इशाराही दिला होता. या भेटीनंतर चीनने तैवान भोवतालच्या सागरी प्रदेशात जोरदार युद्धसराव केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून तैवाननेही आपल्या सामरिक शक्तीचे प्रदर्शन केले होते. त्यामुळे या दोन देशांमध्ये युद्ध होणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने हे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!