पाळीव श्वानांना टोचणार लस, लाभ घेण्याचे आवाहन : बेळगाव तालुक्यात मोफत रेबीज प्रतिबंधक लस
प्रतिनिधी /बेळगाव
रेबिजला आळा घालण्यासाठी पशुसंगोपन खात्यामार्फत जिल्ह्य़ात 15 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. पाळीव श्वानांना ही लस टोचली जाणार असून संबंधित श्वान पालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून श्वानांना लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अलीकडे कुत्र्यांनी माणसांवर हल्ले करण्याच्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबीजची लागण होते. या करिता खबरदारी म्हणून तब्बल 15 दिवस ही मोहीम राबविली जाणार आहे. संबंधित श्वान मालकांनी सकाळी 9 ते 12 यावेळेत जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जावून श्वानांना लस घ्यावी. शिवाय
निरोगी कुत्र्यांना देखील ही लस दिली जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपनने दिली आहे.
जिल्हय़ातील बेळगाव, अथणी, चिकोडी, रायबाग, गोकाक, संकेश्वर, मुडलगी, निपाणी, कागवाड, हुक्केरी आदी भागात ही मोहीम राबविली जाणार आहे. जिल्हय़ात 28 लाखांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये पाळीव श्वानांची संख्या देखील अधिक आहे. या सर्व श्वानांना लस दिली जाणार आहे. शिवाय अलीकडे वेगवेगळय़ा जातीची श्वान पाळणाऱया श्वान पालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत देखील भर पडली आहे.
बेळगाव तालुक्मयात मोफत रेबीज प्रतिबंधक लस
बेळगाव तालुक्मयात देखील 15 सप्टेंबरपासून मोफत रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. तालुक्मयातील हिरेबागेवाडी, सांबरा, उचगाव, अनगोळ, कडोली, येळ्ळूर, बेळगुंदी, आंबेवाडी, काकती, के. के. कोप, हुदली, संतिबस्तवाड, सुळेभावी, हलगा, वडगाव आदी ठिकाणी असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातून ही लस दिली जाणार आहे.
श्वान पालकांना आवाहन
15 ते 30 सप्टेंबर दरम्यान जिल्हय़ात मोफत रेबीज लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. सर्व श्वान पालकांनी याचा लाभ घ्यावा. कुत्र्यांनी चावा घेण्याच्या घटना वाढत आहेत. खबरदारी म्हणून लस घेणे आवश्यक आहे. सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय पशुवैद्यकीय अधिकाऱयांना याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.
– डॉ. राजीव कुलेर ( उपनिर्देशक पशुसंगोपन खाते)