Tarun Bharat

अरिहंत हॉस्पिटलमध्ये 10 मुलांवर मोफत शस्त्रक्रिया

आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत उपचार : नागरिकांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी /बेळगाव

गरिबांसाठी वरदान ठरलेली केंद्र व कर्नाटक सरकारची यशस्वी आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आली आहे. सदर योजना सुरू झाल्याने हृदयासंबंधी व्याधी असणाऱया रुग्णांना याचा लाभ होणार आहे. हृदयाला छिद्र असणे, छातीत वेदना असणे, बायपास शस्त्रक्रियेचा सल्ला दिलेले रुग्ण, हृदयाच्या झडपांचे आजार असलेले रुग्ण, जन्मजात हृदयरोग असणाऱया गरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे. हॉस्पिटलमध्ये लवकरच गॅस्ट्रो, न्यूरो, ऑर्थोपेडिक विभागही सुरू होणार असून सदर रुग्णही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

हॉस्पिटलमध्ये या योजनेंतर्गत 10 मुलांवर हृदयावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापैकी 2 मुलांना डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित मुलांना एक-दोन दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे. आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक ही योजना गरिबांसाठी वरदान ठरत आहे. ही योजना केंद्र सरकार व कर्नाटक सरकार यांच्या संयुक्त समन्वयाने मार्च 2018 मध्ये लागू करण्यात आली. अरिहंत हॉस्पिटलमध्ये नोव्हेंबरमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे. हृदयाला छिद्र व विविध हृदयरोग असणाऱया गरीब रुग्णांना याचा लाभ होणार आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य खात्याशी समन्वय साधून अरिहंत हॉस्पिटलमध्ये जिह्यातील 350 मुलांवर टप्प्याटप्प्याने आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.बेळगाव येथे नव्याने सुरू झालेल्या व काही दिवसांतच नावलौकिक मिळविलेल्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये सदर योजनेंतर्गत आतापर्यंत 10 मुलांवर प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली हृदयावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शस्त्रक्रियेनंतर सर्व मुलांची प्रकृती व्यवस्थित असून सहापैकी दोन मुलांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अरिहंत हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत मुलांपासून वृद्धांपर्यंत हृदयावरील शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

हॉस्पिटलचे संचालक व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी हॉस्पिटलला भेट देऊन सदर योजनेंतर्गत शस्त्रक्रिया झालेल्या सर्व मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना भावी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजना गरिबांसाठी वरदान आहे. पण अनेक रुग्णांना पैशांची तडजोड करताना मोठय़ा समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी उपचाराकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे एकही रुग्ण उपचाराविना राहू नये, ही आमची इच्छा आहे. आता हॉस्पिटलमध्ये आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजना सुरू करण्यात आली आहे. हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सदर योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी केले आहे.

हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या योजनेचा लाभ घ्यावा

गरीब रुग्णांवर योग्य व कमी खर्चात शस्त्रक्रिया व उपचार व्हावेत, हा अरिहंत हॉस्पिटल सुरू करण्यामागचा एकमेव उद्देश आहे. शस्त्रक्रिया म्हटले की गरिबांच्या पायाखालची वाळू सरकते. मात्र, आता अरिहंत हॉस्पिटलमार्फत आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत गरीब रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात येत आहेत. याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटलचे संचालक व युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी केले.

ग्रामीण भागातील रुग्णांना लाभ मिळवून देऊ

अरिहंत हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या आयुष्मान भारत, आरोग्य कर्नाटक योजनेचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ होणार आहे. ग्रामीण भागात असे अनेक रुग्ण आहेत जे पैशांविना उपचार करून घेण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, आता हॉस्पिटलमध्ये योजना सुरू झाल्याने गरीब रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. पैशांविना उपचार करून घेण्याकडे दुर्लक्ष करणाऱया रुग्णांना या योजनेचा लाभ आम्ही मिळवून देऊ. निपाणी, चिकोडी भागातील हृदयासंबंधी समस्या असलेल्या रुग्णांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन युवा नेते उत्तम पाटील यांनी केले.

Related Stories

पुन्हा वकिलांवर धावून जाण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni

जीवनात यशस्वी होण्यासाठी क्रीडा आवश्यक

Patil_p

बैलूर परिसरात करणीबाधेच्या प्रकारात वाढ

Omkar B

ममदापुरात दीपोत्सव भक्तिमय वातावरणात

Amit Kulkarni

मॅथॉडिस्ट चर्चमधील गैरप्रकाराची चौकशी करा

Amit Kulkarni

अक्षय्य तृतीयेचा साधला मुहूर्त

Amit Kulkarni