Tarun Bharat

स्वातंत्र्यसैनिकांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

देशाच्या आणि गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ामध्ये भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी आणि विठ्ठलराव याळगी यांच्या घरी जाऊन पालकमंत्र्यांनी बुधवारी हा सत्कार केला.

यावेळी राजेंद्र कलघटगी व विठ्ठलराव याळगी यांनी त्यावेळच्या संघर्षाची माहिती व आठवण करून दिली. कशाप्रकारे आम्हाला लढा लढावा लागला याची माहिती दिली. राजेंद्र कलघटगी यांचे वय 102 वर्षे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्याबद्दल पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. आताही ते रोज पहाटे 4 वाजता उठून योगा करतात. याचबरोबर त्यांनी घेत असलेल्या आहाराची माहिती दिली.

या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, जि.पं.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. व इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

हुबळी अकादमी अ संघ विजयी

Amit Kulkarni

जैन समाजाच्या सम्यकज्ञान शिबिराची सांगता

Amit Kulkarni

यंदा दहावी परीक्षेवर सीसीटीव्हीची नजर

Amit Kulkarni

मण्णूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासचे आचरण

Amit Kulkarni

अखेर अनगोळ चौथ्या रेल्वे गेटचे काम पूर्ण

Amit Kulkarni

बेळगाव-हैदराबाद ठरला सर्वाधिक लोकप्रिय विमानमार्ग

Amit Kulkarni
error: Content is protected !!