बर्नआउटचा शिकार होण्यापासून होतो बचाव
तुम्ही अनेकदा नोकरदार वर्गाकडून बर्नआउटची (तणाव आणि नैराश्य) तक्रार ऐकलीच असेल. परंतु युवा उद्योजक हे कर्मचाऱयांपेक्षा अधिक काळापर्यंत कामात गुंतलेले असतात, तरीही ते बर्नआउटचे शिकार ठरत नाहीत. यासंबंधी नेदरलँड्सच्या ऍमस्टरडॅम विद्यापीठाने एक संशोधन केले आहे.
उद्योजकांना काम करण्याचे स्वातंत्र्य आणि सतत कुठल्याही कामात गुंतून राहण्याच्या सक्रीयतेमुळे त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. अशा युवा उद्योजकांना गुंतवणुकीतून मिळणाऱया लाभातून त्यांच्यात सकारात्मक ऊर्जेचा एक असा स्रोत तयार होतो, जो अधिक काम केले तरीही थकवा निर्माण होऊ देऊ नाही.
काम करण्याचे स्वातंत्र्य
कामाचा तणाव आणि वेळेचा दबाव उद्योजकांना उच्चस्तरीय इंडिव्हिज्युअल टास्क ऑटोनॉमी प्रदान करतो. हा प्रकार त्यांना पॉझिटिव्ह सायकोलॉजिकल विदड्रॉअलच्या दिशेने नेतो, हे उद्योजकांच्या कामातील मोठय़ा भागीदारीचे कारण ठरत असल्याचे प्रमुख संशोधिका ओब्सचोंका यांनी म्हटले आहे. युवा उद्योजकांना त्यांचे काम त्यांना कर्मचाऱयांच्या तुलनेत अधिक ऊर्जा आणि अधिक सकारात्मक स्थिती प्रदान करते. तसेच ते स्वतःच्या कामाने अधिक आनंदी आणि समाधानी देखील राहतात. विशेषकरून कुठल्याही अन्य कर्मचाऱयांसाठी जबाबदार नसल्याने ते बर्नआउटचा शिकार होत नसल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले.
व्यवसाय अन् बर्नआउटचा संबंध
उद्योजकांनी स्वतःच्या व्यवसायाचा विस्तार केला आणि अधिक कर्मचाऱयांना कामावर नेमले तर बर्नआउटची जोखीम वाढते. स्वतःसोबत कर्मचाऱयांनाही बर्नआउटच्या जोखिमीविषयी जागरुक केले जावे अशी सूचना संशोधनात करण्यात आली.
उद्योजकतेचा दृष्टीकोन
उच्च जोखीमयुक्त नोकरी करणाऱया कर्मचाऱयांसाठी उद्योजकतेचा दृष्टीकोन बाळगणे लाभदायक आहे. यामुळे ते बर्नआउटचा शिकार होण्यापासून वाचू शकतात. तसेच स्वतःच्या कामात झोकून घेत पूर्ण सकारात्मक ऊर्जेने काम करू शकतात.