कपिल सिब्बल यांची एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका
मुंबई : निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये निराशा असून वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मुंबईतील अंधेरी पूर्व येथील निर्णायक पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे. आपल्या निकालपत्रात निवडणुक आयोगाने दोन्ही गटांमधील वाढत्या मतभेदांमुळे निवडणूक चिन्ह गोठवले जाईल असे म्हटले आहे.
काँग्रेस नेते आणि ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांनी आयोगाच्या आदेशावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रविवारी आपल्य़ा ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवणे हे लोकशाही गोठवण्याची किंमत आहे. ‘धनुष्यबाण’ हे उद्धव यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे आहे. भाजपची सेवा करणारे शिंदे यांची गट यांची ‘डिफेक्टर्स प्लेट’ हे निवडणुक चिन्ह अलायला हवे” दरम्यान, महाविकास आघडीचा घटकपक्ष असलेल्या ऱाष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सुद्धा हा निर्णय आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पोटनिवडणूकही लढवणार नाही, तरीही पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी होती. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा अर्थ ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते कमकुवत झाले आहेत किंवा त्यांचे मनोधैर्य खचले आहे असा होत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससह शिवसेना (ठाकरे गट) भाजपला कडवी झुंज देतील, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे विद्यमान आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणुक जाहीर करण्यात आली. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार त्यांच्या पत्नी रुजुता लटके यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना पर्यायी नावे देण्यास सांगितले आहे