प्रतिनिधी /बेळगाव
धावपट्टीवर विमान वेगाने उतरताना ते घसरून कोणताही धोका होऊ नये यासाठी धावपट्टीची फ्रिक्शन चाचणी घेण्यात येते. बेळगाव विमानतळावर दोन दिवसांपूर्वी फ्रिक्शन व्हेईकलच्या साहाय्याने वेगाची चाचणी घेण्यात आली. यावेळी चेन्नई येथील विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळय़ाच्या दिवसात धावपट्टीवर विमान उतरताना ते घसरण्याची शक्मयता अधिक असते. त्यामुळे वारंवार धावपट्टीची चाचणी घ्यावी लागते.
बेळगाव विमानतळावर एका चार चाकी वाहनाच्या साहाय्याने तीव्र गतीने चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याने चेन्नई व बेळगाव येथील कर्मचाऱयांनी आनंद व्यक्त केला.