Tarun Bharat

Kolhapur : मित्रांनीच केला मित्राचा खून; अपमानास्पद वागणूक दिल्याने काढला काटा

मान देत नसल्याने चाकूने भोसकले; इचलकरंजीतील घटना; दोन संशयीतांना अटक

इचलकरंजी प्रतिनिधी

वयाने मोठा असूनही मान देत नाही. सतत डोळे वटारुन बोलतो. या शुल्लक कारणावरुन चिडून दोघा तरुणांनी मित्राचा चाकूने भोसकून खून केला. राहुल बाबू दियालु (वय 22, रा. महानगरपालिका कामगार चाळ, इचलकरंजी) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुशांत शिवाजी हाके (रा. डी मार्टच्या पाठीमागे, दात्तार मळा, इचलकरंजी), सौरभ सचिन साळूंखे (रा. बीएसएनएल कॉर्टस माने, इचलकरंजी) यांना अटक केली असून खून करताना दोघे संशयीत जखमी झाले आहेत. ही घटना शहरातील तीनबत्ती चार रस्ता चौकालगतच्या पद्यावती मेडिकलसमोर सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या खूनाची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबतची माहिती अशी, राहुल दियालु आणि सुशांत हाके, सौरभ साळूंखे हे तिघे अविवाहीत असून चांगले मित्र होते. हाके यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असून, तो सिव्हील इंजिनिअर असलेल्या भावाच्या बांधकाम साईटवर सुपरवायझरचे काम करतो. तर साळूंखे हा शहरातील आयजीएम रुग्णालयात ठेकेदार तत्वावर लॉड्रीबाय म्हणून नोकरी करीत आहे. हे तिघे जेव्हा एकमेकाना भेटत त्यावेळी दियालु वयाने मोठे असलेल्या संशयीत हाकेला मान देत नव्हता. साळूंखेकडेही तो सतत डोळे वटारुन बोलत असे. या कारणावरुन या तिघामध्ये काही दिवसापूर्वी वादावादी झाली होती. त्याच्यावर दोघे संशयीत चिडून होते. त्यातून त्याचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन केला.
दियालु याला संशयीतांनी सोमवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील तीनबत्ती चार रस्ता चौकात बोलावून घेतले. चौकालगतच्या मेडिकल समोर हे तिघे बोलत बसले. याचवेळी दियालु याला बोलण्यात गुंग करीत, दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याच्या पाठीत, खांद्यावर आणि डोक्यात अनेक वार करण्यात आले. डोक्यातील वार वर्मी बसल्याने तो गंभीर जखमी होवून जमिनीवर कोसळला. हे पाहून हाके आणि साळूंखे या दोघांनी घटनास्थळावरुन पलायन केले. दोघापैकी हाके उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल झाला. तर संशयीत साळूंखे घरी पळाला.

माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या दियालू याला उपचाराकरीता आयजीएम रुग्णालयात त्वरीत दाखल केले. पण त् उपचारादरम्यान त्याचा पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मृत्यु झाला. माहिती समजताच दियालुच्या नातेवाईकासह मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात काहीकाळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाअधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक महादेव वाघमोडे आदींनी रुग्णालयात धाव घेवून घडल्या घटनेची माहिती घेतली. संशयीत आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके तयार केली. दुपारी पोलिसांनी दोघा संशयीत तरुणांना अटक केली.

Related Stories

इचलकरंजीत सांडपाणी निचऱ्याचे तीनतेरा; पाणी निचऱ्याचे व्यवस्थापन कुचकामी

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : कणेरीमठ येथील कृषी विज्ञान केंद्र बनत आहे महाविद्यालयीन युवतींचा आधार

Archana Banage

राधानगरी तालुक्यात 27 ते 29 नोव्हेंबर रोजी फिरत्या लोकअदालतीचे आयोजन

Abhijeet Khandekar

गोकुळसह जिल्हा बँक, `राजाराम’ची रणधुमाळी

Archana Banage

कोल्हापुरात येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बनला सुकर

Archana Banage

Kolhapur; वारणेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या

Abhijeet Khandekar