Tarun Bharat

बांगलादेशने निभावली मैत्री, श्रीलंकेकडून निराशा

Advertisements

चिनी-पाकिस्तानी ‘तैमूर’ची बंगालच्या उपसागरावर होती नजर

वृत्तसंस्था / ढाका, कोलंबो

बांगलादेशच्या स्वतःच्या गटात सामील करू पाहणाऱया चीन आणि पाकिस्तानला शेख हसीना सरकारने मोठा झटका दिला आहे. बांगलादेशच्या सरकारने चीनमध्ये निर्मित पाकिस्तानी नौदलाची युद्धनौका पीएनएस तैमूरला चितगाव बंदरावर नांगर टाकण्याची अनुमती देण्यास नकार दिला आहे. पीएनएस तैमूर लेझर गाइडेड क्षेपणास्त्रs आणि शक्तिशाली रडारने युक्त आहे. चीनच्या शांघाय येथून ही युद्धनौका पाकिस्तानी नौदलात सामील होण्यासाठी कराची येथे जात आहे.

 या युद्धनौकेला बांगलादेशच्या बंदरावर नेण्याचा पाकिस्तान आणि चीनचा डाव होता. बांगलादेशच्या बंदरातून बंगालच्या उपसागरातील भारतीय नौदलाच्या हालचालींची हेरगिरी करण्याचा आणि शक्तिप्रदर्शन करण्याचा या दोन्ही देशांचा प्रयत्न होता. याचबरोबर बांगलादेशद्वारे भारताला घेरण्यासाठी तयार करण्यात आलेली ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल’ योजना यशस्वी होत असल्याचे चीन दाखवून देऊ पाहत होता.

चीन म्यानमारमध्ये बंदराची निर्मिती करत आहे. तसेच म्यानमारच्या सैन्याला चीन शस्त्रास्त्रs पुरवत आहे. तर बांगलादेशातही चीनने बंदर विकसित करण्यास मदत केली आहे. याचबरोबर बांगलादेशाने चीनकडून मोठय़ा प्रमाणावर शस्त्रास्त्रs तसेच युद्धनौकेची खरेदी केली आहे. चीनचे हेरगिरी करणारे जहाज भारताचा आणखी एक शेजारी देश श्रीलंकेच्या बंदरावर येण्याची शक्यता आहे. भारताच्या विरोधानंतरही चीनचे हेरगिरी जहाज हंबनटोटा बंदराच्या दिशेने प्रवास करत आहे.  तर पाकिस्तान यापूर्वीच चीनचा आर्थिक गुलाम ठरल्याचे चित्र आहे.

भारताची हिंदी महासागरात कोंडी करण्याची चीनची रणनीति आहे. परंतु चीनच्या या रणनीतिला झटका देत बांगलादेशने पीएनएस तैमूरला थांबण्याची अनुमती देण्यास नकार दिला आहे. 15 ऑगस्टपूर्वी पाकिस्तानची युद्धनौका बांगलादेशच्या बंदरावर येऊ इच्छित होते, आम्ही याला मंजुरी देऊ शकत नाही. 15 ऑगस्ट 1975 रोजी पाकिस्तान समर्थकांनी बांगलादेशचे नेते शेख मुजीर्बुर रहमान यांची हत्या केली होती. बांगलादेशचा होकार मिळविण्यासाठी पाकिस्तान तसेच चीनच्या विदेशमंत्र्यांनी ढाका येथे धाव घेतली होती. तरीही बांगलादेश सरकारने तैमूरबद्दल कठोर भूमिका घेत भारताला दिलासा दिला आहे.

श्रीलंकेकडून मंजुरी

बांगलादेशने युद्धनौकेला स्वतःच्या सीमेत येण्यास मंजुरी नाकारली असताना श्रीलंकेने या क्षेपणास्त्रs अन् दारूगोळय़ाने युक्त पाकिस्तानी युद्धनौकेला स्वतःच्या बंदरावर येण्यास मंजुरी दिली आहे. ही युद्धनौका आता 15 ऑगस्ट रोजी कराची येथे पोहोचणार आहे. पाकिस्तानचे मित्र देश मलेशिया आणि चीनचा अंकित देश कंबोडियाला भेट देत ही युद्धनौका श्रीलंकेच्या बंदरावर पोहोचणार आहे. या युद्धनौकेचा 23 जून रोजी पाकिस्तानी नौदलात समावेश करण्यात आला होता. चीनमध्ये निर्मिती टाइप 054 ए/पी फ्रिगेट स्वरुपाची ही युद्धनौका आहे. पाकिस्तानी नौदलासाठी याच प्रकारातील आणखी दोन युद्धनौका चीन तयार करत आहे.

Related Stories

ब्रिटन : मास्क आवश्यकच

Patil_p

अमेरिकेत महाविनाशाचे हत्यार सक्रीय

Patil_p

रशियन न्यूक्लियर बॉम्बरचे उड्डाण

Patil_p

हंबनटोटामध्ये येतेय चीनचे हेरगिरी जहाज : भारत सतर्क

Amit Kulkarni

‘अनलॉक’मुळे ‘कोरोना विस्फोटा’चा धोका

Patil_p

कोरोनाबाबत WHO चा जगाला गंभीर इशारा !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!