वारणानगर / प्रतिनिधी
बहिरेवाडी (ता. पन्हाळा) येथे शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. संजय भैरू जाधव (वय .५५) रा. बहीरेवाडी ता. पन्हाळा असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलीसात झाली असून आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय जाधव याने बहिरेवाडी येथील कारीच्या ओढ्यालगत असलेल्या शेतातील रामफळाच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या बाबतची वर्दी त्याचा चुलत भाऊ सुभाष जाधव याने पोलीसांना दिली. कोडोली उप जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शववीछेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देणेत आले. त्याच्या मागे पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेडगे करीत आहेत.