नेहमी नकारात्मक भूमिकांमध्ये झळकणारी दीपशिखा नागपाल आता सकारात्मक भूमिकांकडे वळण्याचा विचार करीत आहे. नागपाल गेली अनेक वर्षे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही कार्यरत आहे. पण तिची प्रतिमा नकारात्मक भूमिकांमुळे काहीशी तिरस्करणीय बनली आहे. आता आपण नवे प्रयोग करणार असून निर्मात्यांनीही त्याला मान्यता दिल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरून कलाकार आणि निर्मात्यांना बरेच नवनवे प्रयोग करण्याची संधी असते. त्यामुळे आता इतकी वर्षे काम केल्यानंतर आपल्याला सकारात्मक भूमिका देण्यात निर्मात्यांना कोणतीही अडचण येऊ नये, अशी तिची अपेक्षा आहे. भूमिका साकारण्यासाठी वय किंवा अन्य कोणतीही बाब आड येत नाही, असा आपला अनुभव असल्याचे ती म्हणते. तिच्या काही सकारात्मक भूमिकांचे शूटिंग झालेले असून ते दिग्दर्शक आणि निर्मात्यांना पसंत पडले आहे. त्यामुळे लवकरच ती सकारात्मक भूमिकांमधून तिच्या चाहऱयांसमोर येईल, अशी दाट शक्मयता आहे. वाढत्या वयामुळे नवे रोल मिळत आहेत का? असा खोचक प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर तिने नीना गुप्ता हिचे उदाहरण दिले. वाढत्या वयातच नीना गुप्ताला अधिक चांगल्या भूमिका मिळत गेल्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तिने नाव कमावले. तो आदर्श आपल्यासमोर आहे, असे तिचे म्हणणे आहे. मानसिक शांततेसाठी नव्या भूमिका आवश्यक असून त्याबरोबरच आपण भावातीत ध्यान (मेडिटेशन) व व्यायामावरसुद्धा भर देत आहे, असे काही मौलिक विचार तिने मुलाखतीत व्यक्त केले आहेत.