क्रीडा प्रतिनिधी /फोंडा
फोंडा लायन्स क्लबने आयोजित केलेल्या अखिल गोवा 11 वर्षाखालील खुली व मुलींसाठीची निवड चाचणी स्पर्धा आज शनिवार 1 ऑक्टो पासून मंगेशी येथील वागळे हायस्कूलच्या सभागृहात खेळविण्यात येणार आहे. यात 128 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. स्पर्धेला सकाळी 9 वा. प्रारंभ होणार आहे.
फोंडा तालुका बुद्धिबळ संघटना व गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या सहकार्याने ही स्पर्धा दोन दिवस घेण्यात येईल. स्पर्धेतील प्रथम सहा विजेत्या मुलामुलींना रोख पारितोषिके देण्यात येईल. याशिवाय 7 व 9 वर्षाखालील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात येतील. 2 रोजी पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे.