Tarun Bharat

राजस्थानच्या मंत्र्याचा पुत्र फरार

Advertisements

युवतीवर बलात्काराचा आरोप ः दिल्ली पोलिसांनी घेतला घरात शोध ः नोटीस चिकटविली

वृत्तसंस्था / जयपूर

राजस्थानचे मंत्री महेश जोशी यांचे पुत्र रोहितला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक शनिवारी रात्री उशिरा जयपूर येथे पोहोचले. रोहितने एका युवतीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलीस पथकाने महेश जोशींच्या घराची झडती घेतली, परंतु रोहित तेथे सापडला नाही. पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधल्यास चौकशीत सहकार्य करणार असल्याचा दावा मंत्री महेश जोशी यांनी केला आहे.

मंत्र्याच्या घराची झडती घेण्यापूर्वी दिल्ली पोलिसांनी जयपूर पोलिसांना कल्पना दिली होती. त्यानंतर महेश जोशी यांच्या निवासस्थानी रविवारी पहाटे चार वाजेपर्यंत शोधमोहीम चालली. पोलीस पथक आता महेश जोशी यांच्या शासकीय निवासस्थानी शोध घेणार होते.

रोहित जोशी विरोधात दिल्ली पोलिसांकडे जयपूर येथील एका युवतीने बलात्काराचा गुन्हा नोंदविला होता. पोलिसंनी रोहितशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा मोबाइल बंद असल्याचे आढळून आले. रोहित न मिळाल्याने मंत्र्यांच्या निवासस्थानी नोटीस चिकटविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये 18 मे रोजी दुपारी 1 वाजण्यापूर्वी पोलीस स्थानकात हजर राहण्याची सूचना रोहितला उद्देशून करण्यात आली आहे.

8 मे रोजी जयपूर येथील युवतीने दिल्लीतील पोलीस स्थानकात मंत्री महेश जोशी यांच्या पुत्राविरोधात बलात्कार, मारहाण आणि धमकी यासारखे गुन्हे नोंदविले होते. पीडितेने दिल्लीत स्वतःवर झालेला बलात्कार तसेच अनैसर्गिंक शरीरसंबंधांची व्यथा मांडली होती.

Related Stories

खासगी कंपन्या करणार रॉकेटचे प्रक्षेपण

Patil_p

ममता बॅनर्जींचा पाय झाला बरा

Patil_p

गव्हाचा साठा 5 वर्षांच्या नीचांकी स्तरावर

Patil_p

भाजपसमोर 5 मोठी आव्हाने

Patil_p

विद्यार्थ्यांसाठी कोविड निगेटिव्ह अहवाल अनिवार्य नाही

Patil_p

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 29,326 वर

Tousif Mujawar
error: Content is protected !!