पुलकित सम्राट अन् ऋचा चड्ढा मुख्य भूमिकेत
एक्सेल एंटरटेनमेंटने अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर बॉलिवूडची सुपरहिट कॉमेडी प्रेंचाइजी फुकरे 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. मागील काही काळापासून चाहत्यांना फुकरे 3 ची प्रतीक्षा होती. निर्मात्यांनी नव्या पोस्टर्ससह याच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.
पुलकित सम्राट, वरुण शर्मा, ऋचा चड्ढा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी यांचा ‘फुकरे 3’ हा चित्रपट श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिनी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. फुकरे 3 मध्ये पुलकित सम्राट आणि ऋचा चड्ढा ही जोडी पुन्हा दिसून येणार आहे. हा चित्रपट मृगदीप सिंह लांबा यांच्याकडून दिग्दर्शित केला जाणार आहे. मृगदीपला फुकरे प्रेंचाइजीमुळेच प्रसिद्धी मिळाली होती. यापूर्वी त्याने ‘रुही’ चित्रपटाची कहाणी लिहिली होती. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत याची निर्मिती करण्यात येत आहे.
फुकरे हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. याचमुळे निर्मात्यांनी फुकरे 2 हा चित्रपट आणला होता. या प्रेंचाइजीतील चूचा, पंडित जी, भोली पंजाबन यासारख्या सर्वात पसंतीच्या व्यक्तिरेखा फुकरे 3 मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.