Tarun Bharat

मालवण जेटीचे उदघाटन व बंदर विकासासाठी निधी द्यावा ; आ. वैभव नाईक यांची दादा भुसेंकडे मागणी

Fund should be given for port development – Aa. Vaibhav Naik’s no. Demand from Dada Bhus

बंदर विकास मंत्री दादाजी भुसे यांची आज आमदार वैभव नाईक यांनी भेट घेत बंदर विभागातर्फे उभारण्यात आलेल्या मालवण जेटीचे अधिकृत उदघाटन करण्याची मागणी केली. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील देवबाग संगम येथील साचलेल्या गाळाचा उपसा करण्यासाठी व देवबाग संगम येथे जेट्टी व त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात निधीची तरतूद करण्याची मागणी पत्राद्वारे केली.त्यावर ना. दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंदर विकास विभागामार्फत देवबाग पर्यटन विकासासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले.

   मालवण येथे नवीन जेटी उभारण्यात आली आहे.मात्र त्याचे अधिकृत उद्घाटन झालेले नाही जुनी जेटी जीर्ण झाली असुन त्याठिकाणी दुर्घटना घडू शकते त्यामुळे नवीन जेटीचे अधिकृत उद्घाटन करून किल्ले प्रवाशांसाठी जेटी खुली करावी अशी मागणी आ.वैभव नाईक यांनी ना.भुसे यांच्याकडे केली. किल्ले प्रवासी वाहतूकदारांच्या अडचणी बाबत व देवबाग च्या पर्यटन विकासाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार सैनी,  परिवहन सचिव आशिषकुमार सिंग, मेरीटाईम बोर्डचे श्री. बडये उपस्थित होते. 

मालवण / प्रतिनिधी 

Related Stories

सुरळीत विजेसाठी युवकांची मदत

NIKHIL_N

कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सव आजपासून

NIKHIL_N

दोन लाखाहून अधिक चाकरमानी येणार

NIKHIL_N

महिलांना स्वावलंबी होण्यासाठी घेतला निर्णय

Patil_p

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे निषेध आंदोलन

Anuja Kudatarkar

मलिकांना दणका; ईडीच्या कारवाईला विरोध करणारी याचिका फेटाळली

datta jadhav