विविध विकासकामांना चालना : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, हट्टीहोळी यांच्याकडून निधी मंजूर
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील पंत बाळेकुंद्री गावाला आमदार अनुदानासह दुप्पट अनुदान मिळाले आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे 7 लाखांचे शासकीय अनुदान, मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासोबत विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या 5 लाखांच्या अनुदानातून शाळेची खोली बांधण्यात येणार आहे. चन्नराज हट्टीहोळी यांनी शासकीय उर्दू प्राथमिक शाळेच्या अतिरिक्त खोल्या बांधण्यासाठी एमएलसी अनुदानातून 5 लाख मंजूर केल्यानंतर या कामाचा शुभारंभ केला.
आमदार फंडातून दुर्गादेवी मंदिराच्या कम्युनिटी हॉलच्या बांधकामासाठी 7 लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्याचा पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला आहे. सोमवारी चन्नराज हट्टीहोळी यांनी मंदिर समितीकडे अंतिम धनादेश सुपूर्द केला. श्रावण सोमवारनिमित्त श्री रामलिंगेश्वर मंदिरात हट्टीहोळी यांनी महाप्रसादाचे आयोजनही केले होते.
यावेळी प्रेम, दत्तू, प्रकाश कोलकार, सुरेश तलवार, उमाजीराव जाधव, मैनुद्दीन अगसीमनी, नूर मुल्ला, अफसर, नजीर, युनुफ जमादार, अल्ताफ यादवाड, जानुल मकानदार, सिकंदर अगसीमनी, जमील काझी, होनगौडा पाटील, सुरेश काळोजी, विनय गौडा, रमनगौडा, परळू पाटील, मंदिर समिती सदस्य, उर्दू शाळेचे कर्मचारी, ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.