Tarun Bharat

ओमिक्रॉनमध्ये आणखी परिवर्तन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

ओमिक्रॉनचे उपरुप असणाऱया बीए.2.27 या विषाणूमध्ये आणखी उत्क्रांती होत आहे, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. आता त्यांच्या पासून बीए.2.75.1 आणि बीए.2.75.2 असे नवे विषाणू तयार झाले आहेत. बीए.2.75.2 हा विषाणू अधिक वेगाने संक्रमित होणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तथापि, या नव्या विषाणूंमुळे तीव्र स्वरुपाचा कोरोना होण्याची शक्यता अद्याप तरी दिसत नाही. प्रयोग शाळांमध्ये कोरोना विषाणूंचे 288 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आले आहे. त्यांच्यातील 33 टक्के नमुन्यांचे नव्या विषाणूंमध्ये रुपांतर झाल्याचे आढळून आले आहे. जून 12 ते सप्टेंबर 1 या कालावधीतील कोरोना रुग्णांचे हे नमुने आहेत. मानवी शरीरातच हे विषाणू उत्क्रांत होतात, असे दिसून आले आहे. मात्र, कोरोनाची ही नवी रुपे फारशी धोकादायक नाहीत. त्यांच्यामुळे गंभीर स्वरुपाचा आणि जीवघेणा कोरोना होत नाही, असे स्पष्टपणे दिसून आले आहे. तथापि, प्रत्येकाने अद्यापही दक्षता बाळगणे आणि कोरोनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक आहे. परिस्थिती पूर्णत. नियंत्रणात येईपर्यंत हे करावे, असेही सुचविण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे जिनोम सिक्वेन्सिंग समन्वयक डॉ. राकेश कार्यकर्ते यांनी कोरोना विषाणूंच्या या नव्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकला आहे. महाराष्ट्रतील बहुतेक जनता आता ओमिक्रॉन आणि त्याच्या नव्या स्वरुपांना (व्हेरियंटस्) सरावलेली आहे. त्यामुळे नव्या उदेकाची शक्यता बरीच कमी आहे. जर पूर्णतः नवेच स्वरुप निर्माण झाले तरच आणखी एका उद्रेकाची शक्यता आहे, असे मत त्यांनी मांडले.

Related Stories

डिजिटल प्रचाराचा स्वतंत्ररित्या नमूद करावा लागणार

Patil_p

देशात 19 दिवसात सुमारे 45 लाख लाभार्थ्यांना लसीकरण

Tousif Mujawar

अभिनेता सिद्धार्थचे साहसी पाऊल

Patil_p

संतप्त तेजप्रतापांकडून नव्या संघटनेची घोषणा

Patil_p

‘या’ मुख्यमंत्र्यांनी दिले बीजेपीला आव्हान;2024 मध्ये भाजपला रोखणार

Kalyani Amanagi

पेगॅससच्या कंपनीशी कोणताही व्यवहार नाही

Patil_p