क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे चैतन्य स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित 14 वर्षाखालील फुटसाल नॉकआऊट फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने स्पोर्टिंग हुबळी फुटबॉल अकादमीचा टायब्रेकरवर 5-4 असा पराभव करुन फुटसाल चषक पटकाविला.
हुबळी येथे खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत एमएसडीएफ संघाने पहिल्या सामन्यात एसडब्ल्यूआर संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. एमएसडीएफतर्फे रुजानी उचगावकरने गोल केला. उपांत्यपूर्व सामन्यात एमएसडीएफ संघाने कानूर स्पोर्ट्स अकादमी संघाचा 7-0 असा पराभव केला. एमएसडीएफतर्फे गौरांग उच्चुकरने 4, जीत हरिहरने 3 गोल केले. उपांत्य सामन्यात एमएसडीएफ संघाने एएफसी संघाचा 6-0 असा पराभव केला. या सामन्यात गौरांग उच्चुकर, जीत हरिहरने प्रत्येकी 2, जाईद लिंबुवाले व मन्सूर बेपारीने प्रत्येकी 1 गोल केला. अंतिम सामन्यात एमएसडीएफ संघाने स्पोर्टिंग हुबळी फुटबॉल अकादमीचा 5-4 असा टायब्रेकरमध्ये पराभव केला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 2-2 अशी बरोबरी केली होती. त्यामुळे पंचांनी टायब्रेकर नियमांचा वापर केला. त्यामध्ये एमएसडीएफने 5-4 असा विजय मिळविला. टायब्रेकरमध्ये गौरांग उच्चुकर, जीत हरिहर, मुसावीर बेपारी यांनी गोल केले तर स्पोर्टिंगतर्फे रजत व विजय यांनी गोल केला. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र व पदके देऊन गौरविण्यात आले. या संघाला प्रशिक्षक मानस नाईक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.