Tarun Bharat

जी. जी. चिटणीस, इस्लामिया अंतिम फेरीत

बाबुराव ठाकुर स्मृती हॉकी स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित 35 व्या बाबुराव ठाकुर आंतरशालेय हॉकी स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यातून इस्लामिया संघाने बाशिबन संघाचा 2-0 तर मुलींच्या सामन्यात जी. जी. चिटणीस संघाने ज्ञान मंदिरचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत खेळवण्यात आलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात मुलांच्या सामन्यात इस्लामिया संघाने बाशिबन संघाचा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात 18 व्या मिनिटाला बिलाल बिस्तीच्या पासवर जाहीद लिंबुवालेने पहिला गोल केला. दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला जाहीद लिंबुवालेच्या पासवर बिलाल बिस्तीने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी इस्लामिया संघाला मिळवून दिली. या सामन्यात बाशिबन संघाला गोल करण्यात अपयश आले.

मुलींच्या गटात खेळवण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात जी. जी. चिटणीसने ज्ञान मंदिरचा पराभव केला. या सामन्यात 21 व्या मिनिटाला निशा गवळीच्या पासवर भूमीने गोल करून जी. जी. चिटणीसला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला सेजलच्या पासवर निशा गवळीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी जी. जी. चिटणीसला मिळवून दिली.

गुरुवारी मुलांचा अंतिम सामना इस्लामिया वि. भंडारी यांच्यात सकाळी 11 वा. तर मुलींचा अंतिम सामना जी. जी. चिटणीस विरुद्ध सेंट जॉन काकती यांच्यात खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात 88 जणांना कोरोना बाधा

Patil_p

रास्तारोको आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा

Amit Kulkarni

मध्यवर्ती बसस्थानकात समस्यांचा डोंगर

Omkar B

खानापूर लैला शुगर्सचे 1 लाख टनाचे गाळप पूर्ण

Patil_p

वंटमुरी घाटात तिहेरी अपघातात दोघे ठार

Amit Kulkarni

मलप्रभा ब्रिजवर दोन अवजड वाहनांची धडक, जिवीतहानी टळली

Archana Banage