Tarun Bharat

G7 शिखर संमेलन लांबणीवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

कोरोनामुळे जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचे 46 वे G7 शिखर संमेलन लांबणीवर पडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले. 

ट्रम्प यांनी तेथील स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, G7 शिखर संमेलन 10 जून ते 12 जून दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार होते. मात्र, जगभरातील कोरोनाची परिस्थिती पाहता हे संमेलन सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही देशांचीच G7 संघटना असली तरी देखील संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व हे संमेलन करू शकणार नाही. इतर देशांमधील सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रम्प भारतासह ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरियाला देखील आमंत्रित करणार आहेत. 

G7 या संघटनेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका आहेत. जगातील सात विकसित देशांचा हा एक अभिजात वर्ग आहे. ही संघटना जागतिक अर्थव्यवस्थेची दिशा ठरवते. या देशांचा व्याप जगातील जीडीपीच्या 40 टक्के आहे.

Related Stories

पैसे देत करवून घेतात अपमान

Patil_p

जामीन अर्ज फेटाळल्याने देशमुख आणि मलिक यांच्या मतदानावर प्रश्नचिन्ह

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात मागील 24 तासात 311 पोलिसांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

अजितदादा घटनेत बदल करा असं म्हणायचं आहे का? एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

ट्रम्प यांचे ट्विटर खाते बंद करण्यात भारतवंशी महिलेची महत्वाची भूमिका

datta jadhav

पुन्हा लाखाहून अधिक

Patil_p
error: Content is protected !!