Tarun Bharat

स्वच्छ सर्व्हेक्षणात राज्यात गडहिंग्लजचा सहावा क्रमांक

प्रेरक दौर सन्मान अभियानात सुवर्णपदक

Advertisements

प्रतिनिधी/गडहिंग्लज

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्व्हेक्षण 2022 चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये वेस्ट झोन बरोबरच संपूर्ण राज्यात गडहिंग्लज नगरपालिकेने सहावा क्रमांक पटकावला आहे. तर प्रेरक दौर सन्मान अभियानात शहराला सुवर्णपदक प्राप्त झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
केंद्र शासनाने स्वच्छ सर्व्हेक्षणाचा सर्व्हे केला होता. याचा निकाल आज जाहीर झाला आहे.

घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता त्याचबरोबर अन्य बाबीची तपासणी करण्यात आली होती. विशेष पथकाने शहराची पहाणी करुन मुल्यांकन केले होते. यामध्ये राज्यात सहावा क्रमांक गडहिंग्लज नगरपालिकेला मिळाला आहे. यापुर्वी 13 वा क्रमांक मिळाला होता. त्यामध्ये आता प्रगती झाली आहे. घनकचरा व्यवस्थापनमध्ये गडहिंग्लजला ‘थ्री स्टार’ मिळाला आहे. तर हागणदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ प्लस प्लस हा दर्जा मिळाला आहे. गडहिंग्लज नगरपालिकेच्या इतिहासात आतापर्यंतची ही सर्वोत्तम कामगीरी असल्याने समाधान व्यक्त होत आहे. यात शहरातील नागरिक, नगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान असल्याचे मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी सांगितले.

Related Stories

रस्त्यांची कामे तीन महिन्यांत पूर्ण करा

Archana Banage

पेठ वडगाव पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी संतोष चव्हाण यांची निवड निश्चित

Archana Banage

केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचेच उद्योग

Archana Banage

KOlhapur : नवरात्रोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी ई-पासचीही सोय

Abhijeet Khandekar

Kolhapur; सेंट्रींगचे साहित्य चोरी करणारी टोळी जेरबंद; साडेनऊ लाखाचा माल जप्त

Abhijeet Khandekar

म्हासुर्ली – कोनोली रस्ता ठेकेदाराचे बिल थांबवा – आ. प्रकाश आबिटकर

Archana Banage
error: Content is protected !!