Tarun Bharat

Gaganbawada : घाटातील वाट..गगनबावड्याचा थाट..! सौंदर्याची पर्यटकांना भुरळ

गगनबावडा / प्रतिनिधी

गेल्या आठवड्यापासून गगनबावडा तालुक्यात ऊनपावसाचा खेळ सुरु झाला आहे. हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, अधूनमधून पडणारा पाऊस, घाटमार्गातील धुक्याची दूलयी हे स्रुष्टी सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला ५५ किमी अंतरावरील गगनबावडा म्हणजे शहरवासीयांना मेजवानीच ठरते. ठराविक काळ नव्हे तर संपूर्ण वर्षभर येथे पर्यटकांची वर्दळ असते. अध्यात्मिक वारसा,ऐतिहासिक पार्श्वभूमी, तलाव, नैसर्गिक नवलाई, घाटमार्ग, डोंगररांगा त्यामूळे गगनबावडा म्हणजे प्रतिमहाबळेश्वर होय. कोल्हापूर व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरील मर्द किल्ले गगनगडास अध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. विश्वगौरव पुरस्कार प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या वास्तव्याने ही भूमी पावत झाली आहे. स्थानिक लोकांच्या बरोबरच मुंबई, पुणे, रायगड येथील भाविकांची गर्दी होते. गेल्या आठवड्यापासून तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या डोंगररांगा हिरवाईने नटलेल्या आहेत. काही ठिकाणचे धबधबे आजही कोसळत आहेत. तळकोकण आणि गगनबावडा दरम्यानच्या घाटमार्गातील खोल दऱ्या विविधतेने नटलेल्या आहेत. अधूनमधून कोसळणारा पाऊस, आकाशाच्या दिशेने झेपावणारे धुके, जोराचा वारा हे नयनरम्य, विलोभनिय दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे.

घाटातील वाट,काय तिचा थाट

मिरकते,गिरकते लवते पाठोपाठ.!
असे वर्णन येथील करुळ व भूईबावडा या दोन घाटांना तंतोतंत लागू पडते.कोल्हापूर ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग,गोव्याकडे जाण्यासाठी हे घाटमार्ग सर्वात सोईचे ठरले आहेत.चोवीस तास वाहतूक सुरू असते.पावसाळ्यातील दरडी कोसळण्याचे प्रकार वगळता येथे बारमाही वाहनांची गर्दी असते.या मार्गात सर्वाधिक धबधबे आहेत.दरीतील द्रुश्य डोळ्यात भरणारे आहे. घाटमार्ग हा येथील पर्यटनाचा प्रमुख भाग आहे. तालुक्यात चार तलाव आहेत.पाचवाही पूर्णत्वाकडे आहे.येथील तलावांच्या सभावताली शहरवासियांनी फार्म हाऊस बांधले आहेत.सुट्टीदिवशी रात्रंदिन पर्यटकांची गर्दी असते.एम.टी.डी.सी.फार्महाऊस,हाॅटेल्स त्यामूळे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था झाली आहे.हिरवाई,डोंगररांगा,खोल दऱ्या, अलीकडेच स्रुष्टी सौंदर्य आणखी खुलले आहे.हा परिसर पर्यटकांना भूरळ घालत आहे.महाळळेश्वरच्या धर्तीवर येथील पर्यटन स्थळांवर सुविधा उपलब्ध केल्यास आणखी ओढा वाढणार आहे.

Related Stories

साताऱयात बनतोय बनावट विमल, आरएमडी

Patil_p

विश्वनाथराव सरनाईक यांचे सहकारातील योगदान मोठे – सहकारमंत्री पाटील

Archana Banage

सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन संघटने विरोधात आक्रमक आंदोलन; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

Archana Banage

विधवा महिलांच्या सन्मानासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने उचलले पाऊल..!

Archana Banage

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित

Abhijeet Khandekar

रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय कॉलचे पाकिस्तान कनेक्शन उघड

Archana Banage