नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी गॅस कंपनी गेल (इंडिया) लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक व चेअरमनपदी संदीप कुमार गुप्ता यांची निवड झाली आहे. संदीप कुमार गुप्ता हे याआधी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन(आयओसी) चे वित्त विभागाचे संचालक म्हणून काम पाहात होते. नैसर्गिक वायुच्या क्षेत्रात कंपनीचा विकास व विस्तार यापुढेही चालूच राहणार असल्याचा भरवसा नूतन चेअरमन गुप्ता यांनी कर्मचाऱयांपुढे बोलताना दिला.