क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लोकमान्य टिळक मार्ग झेंडा चौक मार्केट व बेळगाव जिल्हा शरिरसौ÷व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या रावसाहेब गोगटे चषक टॉप टेन करेला स्पर्धेत कोरे गल्लीच्या गजानन रमेश गावडोजी याने 269 करेला करून पहिला क्रमांकासह रावसाहेब गोगटे चषक पटकाविला.
रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या रावसाहेब गोगटे टॉप टेन करेला स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे सुहास शिरोडकर, बसवराज अरळीमट्टी, राजू नलवडे, सुनील राऊत, एम. के. गुरव, गंगाधर एम. आदी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मूर्तीचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. 50 हून अधिक करेलापटूंनी भाग घेतला.
निकाल – गजानन रमेश गावडोजी 269 करेलासह प्रथम क्रमांक, सागर गंगाराम गोरे 261 करेलासह दुसरा क्रमांक, यशवंत भाऊ सुतार 260 करेलासह तिसरा क्रमांक, सुमित संपत कामुले 259 करेलासह चौथा क्रमांक. जोतिबा रघुनाथ बाचीकर 257 करेलासह पाचवा क्रमांक, मंजुनाथ गोपाळ सांबरेकर 255 करेलासह सहावा क्रमांक, गणेश गुंडू जांगळे 255 करेलासह सातवा क्रमांक प्रमोद हणमंत पाटील, 180 करेलासह आठवा क्रमांक नागेश्वर शिवाजी गावडोजी 154 करेलासह नववा क्रमांक, मदन पांडुरंग शिंदे 125 करेलासह दहावा क्रमांक पटकाविला.
बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे सुहास शिरोडकर, सुनील जाधव, जे निलकंठ, उमामहेश, जे. निलकंठ, अजित सिद्दण्णावर, अर्जुनसिंग रजपूत शाम बकुलकर, प्रवीण पाटील, हेमंत हावळ, गिरीष धोंगडी, विजय जाधव, स्वाती गेंजी, स्नेहल बिर्जे, चेतन अक्कोळ, भाऊराव शिरोळकर, शेखर जानवेकर, प्रकाश कारदगे, विजय चौगुले, सुनील मुरकुटे, बसवराज विभूती, राजू मोरे आदी मान्यवरांच्या हस्ते टॉप टेन विजेत्यांना पदके, प्रमाणपत्र, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून हेमंत हावळ, राजु नलवडे व बसवराज अरळीमट्टी यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ झेंडाचौक मार्केटच्या पदाधिकाऱयांनी विशेष परिश्रम घेतले.