Tarun Bharat

कडेगाव तालुक्यात जुगार, मटका जोमात; पोलीस प्रशासन कोमात

बेकायदा दारू, गुटखा, सावकारी धंद्यांनाही ऊत

Advertisements

कडेगाव/प्रतिनिधी

कडेगाव शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांना उत आले आहे. बेकायदा मटका, जुगार, दारू, गुटखा, सावकारी गौण खनिज तस्करी आदी अवैध धंदे राजरोसपणे जोमात तर पोलीस प्रशासन कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन आणि अवैध धंदे यांचे लागेबांधे असल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी लक्ष घालून अवैध धंद्याना चाप लावावा अशी मागणी होऊ लागली आहे.

कडेगाव तालुक्यात कडेगाव व चिंचणी वांगी अशी दोन पोलीस ठाणी आहेत. मात्र फोफावलेल्या मटका आणि जुगार अड्यांवर पोलिसांचे अंकुश नसल्याचे दिसून येते. शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे खुलेआम सुरु आहेत. वाढत्या अवैध धंद्यामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात अवैध धंदे खुलेआम सुरु असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कडेगावसह तालुक्यात ५५ गावांचा समावेश आहे. कडेगाव हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ये जा करणाऱ्या लोकांची गर्दी मोठी असते. तर शुक्रवारी आठवडा बाजार असतो. या बाजारात भुरट्या चोरांची संख्या वाढली असून किरकोळ चोरीचे प्रमाण वाढले आहे. तर गेली काहीदिवस झाले शेती अवजारांच्या साहित्याची चोरीही वाढली आहे. सक्रिय चोरटी टोळी राजरोसपणे फिरत आहे. मात्र पोलीस पराशासनाकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. तर शहरासह तालुक्यात सर्वत्र खुलेआम गुटखा, मावा, सुपारी विक्री केली जात आहे. मोठं मोठे व्यापाऱ्यांचा यामध्ये समावेश असून लाखो रुपयांची दररोज उलाढाल यातून होत आहे. तालुक्यात बेकायदा दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.

अण्णाभाऊसाठे नगर, एमआयडीसी येथे खुलेआम जुगार
शहरातीळ अण्णाभाऊ साठे नगर जवळ, दत्त नागरी पतसंस्था पाठीमागे ,भारती विद्यापीठ रोड जवळ, शहरापासून २ किलोमीटरच्या अंतरावर एमआयडीसी येथे खुलेआम बेकायदा पत्ते व जुगार सुरू आहे. याचबरोबर तालुक्यातील चिंचणी, वांगी ,देवराष्ट्रे परिसरातही खुलेआम जुगार व मटका सुरू असल्याचे दिसून येते असतानाही याकडेही कानाडोळा केला जात आहे.

मटका तेजीत
तालुक्यातील कडेगाव, कडेपुर ,वांगी ,देवराष्ट्रे परिसरात मुख्य मटका चालवला जातो.मटका बुकी कोट्याधीश झाले आहेत.मटका बहाद्दर कोण-कोण आहेत .मटका कोण घेत आहे हे माहीत असताना देखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सावकारानी केली घरे उध्वस्त
बेकायदा सावकारीचे तालुक्याला ग्रहण च लागले आहे.मासिक १० ते १५ टक्के आकारणी सावकार करतात. व्याज दिले नाही तर व्याजापोटी जप्त करून आणलेल्या अनेक दोन,चार चाकी वाहनांचा बाजार सावकारांच्या घरासमोर दिसून येतो. फोफावले हे सावकार तारण म्हणून कोरे चेक व दस्त ऐवजांचा साठा करतात. याद्वारे नंतर संबंधित पीडिताची जमीन व घरं नावावर करून घेत असल्याचे प्रकार दिसतात. भिकेला लागलेले अनेक लोक आज सावकार म्हणून लाखो रुपयांच्या गाड्यातून फिरताना दिसतात. मात्र या सावकारांनी अनेक लोकांचे घरे उद्धवस्त करूनही पोलीस भूमिका घेताना दिसत आहे.

Related Stories

मिरजेत विद्युत ट्रान्सफार्मला भीषण आग

Abhijeet Shinde

कुपवाडमध्ये अल्पवयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Sumit Tambekar

सांगली : शांतिनिकेतनमध्ये 1971 युध्दातील रणगाडा दाखल

Abhijeet Shinde

आमदार पडळकर यांचे राज्यभर घोंगडी बैठकांचे आयोजन

Abhijeet Shinde

मणेराजुरीनजीक अपघातात एक ठार

Abhijeet Shinde

सांगली : उद्यापासून हॉटेल, दुकाने, मॉल, जिम दहापर्यंत सुरु

Abhijeet Shinde
error: Content is protected !!