Tarun Bharat

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

इंग्रजी उत्तरपत्रिका तपासण्यासाठी इतर माध्यमाच्या शिक्षकांना विनंती : अधिकाऱयांचे तपासणी केंदात ठाण

प्रतिनिधी /बेळगाव

शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरूच आहे. हजारो रुपये खर्च करून पालक आपल्या पाल्यांना मोठय़ा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवितात. परंतु त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका दुसऱयाच माध्यमाचे शिक्षक तपासत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांच्या मनाविरुद्ध त्यांच्यावर सक्ती करून पेपर तपासणी केली जात आहे. या प्रकारामुळे पालकांमध्येही नाराजी असून शिक्षण विभागाने चालविलेला हा खेळ थांबविण्याची मागणी होत आहे.

शनिवारपासून उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली. सोमवारपर्यंत मराठी व कन्नड माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासणी संपत आली होती. उर्वरित तपासणी मंगळवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्मयता आहे. तपासणी पूर्ण झाली तरी या शिक्षकांना अद्याप तपासणी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आलेले नाही. इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका शिल्लक असल्याने त्या तपासण्यासाठी विनंती केली जात आहे.

गैरहजर शिक्षकांना बोलाविले कामावर

काही इंग्रजी माध्यमाचे शिक्षक गैरहजर आहेत. त्यांना तातडीने उत्तरपत्रिका तपासणी करण्यासाठी केंद्रावर बोलाविण्यात आले. पेपर तपासणी पूर्ण होण्यासाठी शैक्षणिक जिल्हय़ातील सर्व वरि÷ अधिकारी तपासणी केंद्रांवर ठाण मांडून आहेत. इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका मोठय़ा प्रमाणात असल्याने त्या कशा तपासायच्या, असा प्रश्न त्यांच्यासमोर असल्याने कन्नड, मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासण्याची विनंती केली जात आहे.

सक्ती करण्यात आलेली नाही : बसवराज नलतवाड (जिल्हाशिक्षणाधिकारी)

उत्तरपत्रिका तपासणी करताना कन्नड, इंग्रजी अथवा उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासणी करण्याची सक्ती करण्यात आलेली नाही. बोर्डाच्या नियमावलीनुसार एका माध्यमाच्या उत्तरपत्रिका दुसऱया माध्यमाच्या शिक्षकाला तपासण्यास दिल्या जात नसल्याचे जिल्हाशिक्षणाधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.

उत्तरपत्रिका तपासणीसाठी 25 रुपये तर दंड 1 हजाराचा

प्रत्येक शिक्षकाला एक उत्तरपत्रिका तपासणीसाठी 22 ते 25 रु. दिले जातात. जर विद्यार्थ्याने पुनर्तपासणीसाठी पेपर पाठविल्यास त्यात चुका आढळल्यास संबंधित शिक्षकाला 500 ते 1 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. कन्नड, मराठी माध्यमाचे शिक्षक ज्यावेळी इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासतात त्यावेळी चुका होतातच. त्यामुळे दंड भरावा लागत असल्याने शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या उत्तरपत्रिका तपासण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

बेळवट्टी येथे ट्रक अपघातात युवक ठार

Amit Kulkarni

चिकोडी येथे बंदला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

चन्नम्मा सर्कल येथे कारला आग

Amit Kulkarni

वीजबिल न भरल्याने हेस्कॉमने स्मार्ट सीटीचे कनेक्शन तोडले

Amit Kulkarni

रविवारी 601 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

Patil_p

कर्नाटक: राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या २ लाख पार

Archana Banage