राजकुमार संतोषी यांचा चित्रपट
नव्या वर्षातील पहिल्या महिन्यात राजकुमार संतोषी यांचा गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 26 जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर आता जारी करण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी यांनी 9 वर्षानी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पुनरागमन केले आहे.
मोशन पोस्टरमध्ये महात्मा गांधी आणि नथुराम गोडसेंच्या व्यक्तिरेखांना आमने-सामने दाखविण्यात आले आहे. तसेच या भूमिका साकारणाऱया कलाकारांबद्दल माहिती देण्यात आली आहे. महात्मा गांधी यांची भूमिका दीपक अंतानी साकारत आहे, तर नथुराम गोडसेच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर दिसून येणार आहे. असगर वजाहतने या चित्रपटाची कहाणी लिहिली आहे. चित्रपटात महात्मा गांधी आणि गोडसे यांच्यातील वैचारिक मतभेदावा कहाणीचा आधार करण्यात आले आहे.
राजकुमार संतोषी यांनी अनेक यशस्वी चित्रपटांचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. यात सर्वात चर्चेत राहिलेले चित्रपट ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ आहेत. या तिन्ही चित्रपटांमध्ये सनी देओलने मुख्य भूमिका साकारली होती. घायल आणि दामिनी या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. याचबराब्sार ‘खाकी’ हा चित्रपट देखील यशस्वी ठरला होता.
‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट 26 जानेवारीला प्रदर्शित होतोय. या चित्रपटाला शाहरुख खानच्या ‘पठान’ चित्रपटाच्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. पठान हा चित्रपट 25 जानेवारी रोजी झळकणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठान हा स्पाय थ्रिलर धाटणीचा असून यात दीपिका पदूकोन तसेच जॉन अब्राहम देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.