Tarun Bharat

गांधींना ब्रिटीशांकडून दरमहा 100 रुपये मिळायचे; भाजप नेत्याचा जावईशोध

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

ब्रिटीश सरकार महात्मा गांधींना (Mahatma Gandhi) दरमहा 100 रुपये पेन्शन स्वरुपात देत असल्याचा जावईशोध भाजपा नेते अवधूत वाघ (Avadhut Wagh) यांनी लावला आहे. वाघ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपल्या सर्वांच्या लाडक्या महात्मा गांधींना देखील ब्रिटीश सरकार दरमहा 100 रुपये द्यायचे. त्यावेळी सोने 18 रुपये तोळा होते. म्हणजे तत्कालीन 100 रुपये आजच्या 275000 रुपयांसमान होते. पण मी याला पेन्शन म्हणणार नाही. सावरकरांच्या 60 रुपयांच्या मानाने 66 टक्के जास्त रक्कम आहे ही.”

दरम्यान, वाघ यांच्या या ट्विटमुळे गांधीवादींनी संताप व्यक्त केला असून, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विष्णूचा अकरावा अवतार म्हणून संबोधलं होतं. त्यावरुनही त्यांना जोरदार टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

Related Stories

भिवंडीमध्ये गोदाम कोसळले; 7 मजूर अडकल्याची शक्यता

Tousif Mujawar

गिरगावात जिल्ह्याबाहेरुन आलेल्यांना गृह अलगीकरणात ठेवणार

Archana Banage

बाजारात छापलेले आधार स्मार्ट कार्ड वैध नाही

datta jadhav

’जम्बो’ त वेटिंग रुग्णांसाठी मिळणार सुविधा

Patil_p

महानगरपालिका, नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढणार

datta jadhav

मोठी बातमी ! यूट्यूब आणि जीमेलसह गुगलच्या बंद पडलेल्या सेवा पुन्हा सुरू

Archana Banage