धर्मग्रंथाच्या अवमानाचे प्रकरण
फरीदकोट : श्री गुरु ग्रंथ साहिबच्या अवमान केल्याचा आरोप असलेले डेराप्रेमी प्रदीप सिंह यांची गुरुवारी पंजाबच्या फरीदकोटमध्ये हत्या करण्यात आली आहे. स्वतःचे दुकान उघडत असताना प्रदीप यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 2 दुचाकींवरून आलेल्या 5 गुंडांनी त्यांच्यावर अनेक गोळय़ा झाडल्या आहेत. या हल्ल्यात प्रदीप सिंह यांच्या सुरक्षारक्षकासह तीन जण जखमी झाले आहेत. तर या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी बराडने स्वीकारली आहे. गोल्डी बराड हा पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा सूत्रधार आहे. प्रदीप यांच्यावर 2015 मध्ये धर्मग्रंथाचा अवमान केल्याचा आरोप आहे. प्रदीप यांना याप्रकरणी अटकही करण्यात आली होती, परंतु सध्या ते जामिनावर बाहेर होते. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर प्रदीप यांना सुरक्षा प्रदान करण्यात आली होती.