Tarun Bharat

कचेरी गल्ली गणपती मंदिरात गणहोम

प्रतिनिधी/ बेळगाव

शहापूर, कचेरी गल्ली येथील अत्यंत पुरातन गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून हनुमान जयंतीचा मुहूर्त साधून शनिवारी मंदिरामध्ये गणहोमसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. मूळचे बेळगावचेच व सध्या सातारा येथे राहणारे आयकर अधिकारी विनायक आगाशे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

शनिवारी मंदिरामध्ये गणपतीला अभिषेक घालून पूजा करण्यात आली. विद्या व विनायक आगाशे यांनी संकल्प करून पुण्याह वाचन केले. देवता स्थापन करून नवग्रहांची पूजा करण्यात आली. त्यानंतर गणहोम झाला. पूर्णाहुती, अभिषेक, आरती झाल्यानंतर आशीर्वचन झाले.

प्रभाकर वडेर, संदीप व विनायक वडेर, दर्शन व संजीव कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले. हे अत्यंत प्राचीन मंदिर असून मंदिराचे मूळ स्वरुप कायम ठेवून आवश्यक असा जीर्णोद्धार विनायक आगाशे यांनी केला आहे. या निमित्ताने  आगाशे कुटुंबीय व आप्तस्वकीय जमले होते. सर्वांनी विश्वकल्याणासाठी मंगल कामना केली. 

Related Stories

मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द

Amit Kulkarni

थंडीने चिकन-अंडय़ांच्या मागणीत वाढ

Amit Kulkarni

भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने कणबर्गीत भीती

Amit Kulkarni

तिरूपती, कडाप्पा व चेन्नई शहरांना विमानसेवा पुर्ववत

Patil_p

दिवाळीच्या दागिन्यांनी सुवर्णपेढय़ा झळाळल्या

Amit Kulkarni

साईबाबा बेकर्सचे उद्घाटन

Amit Kulkarni