Tarun Bharat

करमळीत सहा लाखांचा गांजा जप्त

झारखंड येथील 19 वर्षीय युवतीला अटक

प्रतिनिधी /पणजी

अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) करमळी येथे केलेल्या कारवाईत सहा लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला असून याप्रकरणी झारखंडच्या 19 वर्षीय युवतीला अटक करण्यात आली. तिच्याविरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयित युवतीचे नाव मुस्कान रोहीत कारुवा (वय 19, झारखंड) असे आहे. ही कारवाई बुधवारी रात्री 7.30 ते 11 च्या दरम्यान करण्यात आली.

संशयित युवती गोव्यात गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. एएनसी पोलिसांनी विविध पथके तयार करून करमळी रेल्वे स्थानकावर तैनात ठेवली होती. सदर युवती करमळी रेल्वे स्टेशनवर उतरली व स्टेशनच्या बाहेर जायला निघाली, तेव्हा पोलिसांनी तिचा पाठलाग केला आणि जवळच पेठेöकरमळी-ओल्ड गोवा या ‘टी’ जंक्शन रस्त्यावर अटक केली. तिच्याकडून सहा किलो गांजा जप्त करण्यात आला.

युवती गांजाविषयी अनभिज्ञ

संशयित युवती अशिक्षित असून गरीब घराण्यातील आहे. आपण काय करतो आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो, याची तिला कल्पनाच नव्हती. केवळ पैसे मिळतात म्हणून ती गोव्यात गांजा घेऊन यायची आणि ठरलेल्या ठिकाणी नेऊन देत होती. तिच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन गोव्यात गांजा पाठविण्यासाठी नियोजितपणे तिचा वापर केला जात असे. तिला पोलीस अटक करू शकतात याचीही तिला कल्पनाही नव्हती. या अगोदरही एकदा ती गोव्यात गांजा घेऊन आली होती. पार्सल आणण्यासाठी तिला रेल्वेचे जाण्याचे आणि येण्याचे तिकिट तसेच पाच हजार रुपये दिले जातात. असे तिने जबानीत सांगितले आहे. एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

‘नंबर वन’ गोव्याच्या एएनसी पोलिसांची बिकट अवस्था

ड्रग्स प्रकरणात युवतीला अटक केली असली तरी पुढील सोपस्कर पूर्ण करून या प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एएनसी विभागात महिला पोलीस कर्मचारी नसल्याने तपास अधिकाऱयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. संशयित युवतीला चार दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली असली तरी युवतीसोबत राहणार कोण तसेच तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यासाठी किंवा न्यायालयात घेऊन जाण्यासाठी तिच्या सोबत नियमानुसार महिला पोलिसांनी जाणे आवश्यक आहे. मात्र एएनसी विभागात महिला पोलीसच नसल्याने हे प्रकरण हाताळावे, कसे असा प्रश्न निर्माण झाला. अशा बिकट परिस्थिती एएनसी पोलीस पुढील तपास करीत आहे.

Related Stories

‘सेवा पंधरवडय़ा’च्या पहिल्या दिवशी काणकोणच्या किनारपट्टीची सफाई

Amit Kulkarni

डॉ. चंद्रकांत शेटये यांचा आज वाढदिवस

Amit Kulkarni

सेसा कंपनीच्या कामगारांना काढू नका!

Amit Kulkarni

दोन वर्षानंतर सत्तरीतील शाळा पुन्हा गजबजल्या

Amit Kulkarni

मिराबाग येथे बेकायदा चिरेखाणीत ट्रक पाण्याखाली गेला

Amit Kulkarni

आयआयटी विरोधी आंदोलन सालेली गावातील आंदोलनाच्या स्मृती जागविणारे

Omkar B