Tarun Bharat

बेतोडा येथे जीपगाडीचा पाठलाग करीत दोन लाखाचा गांजा जप्त

Advertisements

फोंडा पोलिसांची बेधडक कारवाई

प्रतिनिधी /फोंडा

बेतोडा बायपास जन्क्शनजवळ अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी जीपगाडीचा पाठलाग करीत फोंडा पोलिसांनी एका युवकाला बेतोडा येथून फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले. बिकास चंद लक्ष्मीधर स्वान (वय 28, मूळ ओरीसा) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री केलेल्या धडक कारवाईमध्ये त्याच्याकडून दोन किलोग्राम वजनाचा अंदाजे रू. 2 लाख किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. 

फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयित युवक बेतोडा येथे अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे फोंडा पोलिस त्याच्यावर पाळत ठेऊन होते. साधारण 2 किलोग्राम वजनाच्या गांजासह त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक परेश सिनारी, नितेश काणकोणकर, सहाय्यक उपनिरीक्षक जितेंद्र गावडे, हवालदार केदारनाथ जल्मी, सूरज गावडे, कॉन्स्टेबल अमेय गोसावी,  महेश गावडे, आदित्य नाईक, कीरण लोंडे यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गांजाविषयी मुंख्य स्रोतापर्यत पोहोचण्यास पोलिसांचे अजूनपर्यत यश आलेले नाही. सदर संशयिताला अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवून एक दिवसांच्या रिमांडवर पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Related Stories

मुंबईचा पराभव; बेंगलोर 4-1 गोलानी विजयी, छेत्रीचे दोन गोल

Amit Kulkarni

भाजप सरकारला घरी पाठविण्याची वेळ आलीय

tarunbharat

एमडीच्या नियुक्तीवरून गोवा डेअरीची आमसभा चर्चेविना रद्द

Amit Kulkarni

ओडिशाचा पराभव करून नॉर्थईस्ट युनायटेड तिसऱया स्थानावर

Amit Kulkarni

पावसाची दडी, शेतीवर परिणाम

Amit Kulkarni

टर्शरी कॅन्सर केअर सेंटरच्या 247 कोटी खर्चास मंजुरी

Amit Kulkarni
error: Content is protected !!