शौनक अभिषेकी, नचिकेत देसाईसारख्या दिग्गज कलाकारांच्या मैफली : पत्रकार परिषदेत देवस्थान समितीने दिली माहिती
प्रतिनिधी /डिचोली
गावकरवाडा डिचोली येथील श्री शांतादुर्गा मंदिरातील नवा सोमवार उत्सव यावषी मोठय़ा उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. सोम. दि. 28 नोव्हें. रोजी होणाऱया या नवा सोमवार उत्सवात प्रसिद्ध गायक कलाकार शौनक अभिषेकी, नचिकेत देसाई व इतर गायकांच्या मेफली होणार आहेत. या उत्सवाची तयारी जोरदारपणे सुरू आहे, अशी माहिती श्री शांतादुर्गा देवस्थान ग्रामस्थ गावकर मंडळाचे अध्यक्ष सतीश गावकर यांनी दिली.
गेली दोन वर्षे कोवीड महामारीमुळे हा उत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला होता. तरीही लोकांची व भाविकांची उपस्थिती खुप मोठी होती. तरीही या उत्सवात कोणत्याही प्रकारचे विघ्न किंवा गालबोट लागले नाही. देवीच्या कृपेने सदर दोन्ही वर्षांचे उत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरे झाले होते. कोवीड महामारीचा काळ संपल्यानंतर प्रथमच यावषी पुर्ण क्षमतेने नला सोमवार उत्सव होत आहे. या उत्सवासाठी गावकरवाडा येथे मंदिरात व परिसरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. असेही अध्यक्ष सतीश गावकर यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला सचिव श्यामू गावकर, खजिनदार सुनिल परब, कांता गावकर, वासुदेव गावकर, रवळू गावकर, सुनील गावकर, आशिश गावकर, निशाकांत गावकर, वल्लभ परब, सतीश उर्फ धाकटू परब, शांबा गावकर, अमृत परब, बाबू गावकर आदींची उपस्थिती होती.
प्रसिद्ध गायक कलाकारांच्या मैफली
गावकरवाडा येथील नला सोमवार उत्सवात रात्री मंदिरातून देवीची पालखी समोरील मंडपात दाखल झाल्यानंतर पहिली संगीत मैफल अरूण दाते प्रस्तुत “भक्ती भावधारा” सादर होणार. त्यात प्रसिध्द गायक कलाकार नचिकेत देसाई (मुंबई), गायिका पल्लवी पारगांवकर (मुंबई), वर्षा जोशी (मुंबई) या संगीत सादर करणार आहेत. तर या मेफलीचे निवेदन संगीता जोशी करणार आहेत. तर रात्री 1.30 वा. श्री देव रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात “अभंगगायन” हि दुसरी मैफल होणार आहे. त्यात सुप्रसिद्ध गायक शौनक अभिषेकी (मुंबई), वैदेही मळीक (मुंबई) यांचे गायन सादर होणार. तर नेहा उपाध्ये (मुंबई) या निवेदन करणार आहे.
श्री देवी शांतादुर्गेचा दिवजोत्सव व कालोत्सव यामधील एक सोमवार हा नवा सोमवार म्हणून साजरा केला जातो. त्यानुसार यावषी 28 नोव्हें. हा दिवस एका खास सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आला आहे. या दिवशी सकाळी श्री देवी शांतादुर्गेला महाभिषेक, लघुरुद्र, आरती, तीर्थप्रसादानंतर सर्व भाविक भक्तांना देवीची भक्तीरूपाने सेवा करण्याची संधी रात्री उशिरापर्यंत दिली जाणार. रात्री 9 वा. सर्व भक्तजनांच्ता उपस्थितीत देवीला गाराणे घालून देवीच्या जयघोष व नामघोषाने सुप्रसिद्ध दत्तप्रसाद भजनी मंडळ दि?डी पथक, उभादांडा वेंगुर्ले तसेच हनुमान ब्रास बँड बाणास्तरी यांच्या संगतीने व दारूकामाच्या आतषबाजीने पालखी मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. पालखी गावकरवाडा येथे भाविकांना भेट देऊन पहाटे पुर्ववत मंदिरात दाखल होणार आहे. पालखीचे विधीवतपणे मंदिरात आगमन झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे.