रस्त्याच्या दुतर्फा भटकी कुत्री, मांजरे, पक्षामुळे दुर्गंधीमय वातावरण : संबंधितांनी तातडीने लक्ष घालण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
उचगावनजीकाया, बेळगुंदी फाटय़ाजवळ नाल्याच्या शेजारील रस्त्याच्या दुतर्फा कचऱयाचा डेपो निर्माण झाल्याने या ठिकाणी भटकी कुत्री, मांजरे आणि पक्षी यांच्यामुळे सदर भाग दुर्गंधीमय बनला आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक वाहन चालकांना होत आहे. यी संबंधितांनी तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या भागातील नागरिक आणि प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरून रोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. बेळगुंदी फाटय़ानजीक नाल्याया दुतर्फा अनेक नागरिकांनी कचऱयाचा डेपोच निर्माण केल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये कचऱयासह मेलेली कुत्री, मांजरे, उंदीर, घुशी असे अनेक प्राण्यांचे मृतदेह टाकण्यात येत असल्याने तसेच या भागातील चिकन सेंटरमधील टाकाऊ कोंबडय़ांचा पदार्थ टाकण्यात येत असल्याने दुर्गंधीमय वातावरण निर्माण झाले आहे.
कारा टाकणाऱयांवर कारवाईाााr मागणी
य्चा ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठय़ा प्रमाणात वाढल्याने रात्रीच्या अंधारात कुत्र्यांचा अंदाज दुचाकी चालकांना येत नसल्याने, अपघाताया प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये अनेक दुचाकीचालक जखमी झाले आहेत. अनेकांचे हात-पाय पॅक्चर झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर ठिकाणचा कचरा उचलावा तसेच या ठिकाणी कचरा टाकण्यात येऊ नये, टाकल्यास त्यांयावर कठोर कारवाई करावी अशा प्रकारचे फलक लावून कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.
हॉटेल मालकांना साना करण्यो आवाहन
बेळगाव बाची मार्गावर जवळपास 25 ते 30 शाकाहारी, मांसाहारी व इतर हॉटेल्स, उपहारगृह झाल्याने तेथीलही टाकाऊ पदार्थ येथे टाकत असल्या अंदाज व्यक्त करण्यात येत आाहे. कदाािात त्यामुळे येथे भटक्या कुत्र्यां अधिक वावर वाढल्यो समजते. यासाठी या भागातील सर्व हॉटेल मालकांनाही हॉटेलमधील शिल्लक अन्न व इतर टाकाऊ पदार्थ रस्त्याच्या कडेला टाकू नये अशा सूचना कराव्यात अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे.