Tarun Bharat

कोंब येथे रस्त्यानजीक फेकलेला कचरा हटविला

परिसराला प्राप्त झाले होते बकाल स्वरूप, स्थानिक नगरसेवक सगुण नाईक यांचा पुढाकार, बुलडोझरचा वापर

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव पालिका क्षेत्रातील कोंब येथील प्रभाग 12 मधील कोका कोला डेपोला भिडून असलेल्या चिंचोळय़ा रस्त्यानजीक पालिकेच्या कचरा उचल केंद्रानजीक मोठय़ा प्रमाणात बाहेरील लोक मिश्र कचरा टाकत असल्याने या परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. स्थानिक नगरसेवक सगुण उर्फ दादा नाईक यांनी बुलडोझर वापरात आणून येथील कचऱयाचे ढीग मंगळवारी सकाळी हटविले.

सदर कचरा मिश्र स्वरूपाचा होता. त्यात जास्त करून रेस्टॉरंटममधील कचऱयाचा समावेश होता, तर काही जण येथे वैद्यकीय कचरा टाकत होते, असे नगरसेवक नाईक यांनी सांगितले. आपल्याकडे यासंदर्भात स्थानिकांच्या तक्रारी आल्या होत्या. कचऱयामुळे परिसरात दुर्गंधी तर पसरत होतीच, त्याशिवाय त्यातून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. सदर कचरा हटविण्यासाठी आपणास स्थानिक आमदार दिगंबर कामत यांनी बुलडोझर व ट्रक पुरवून मदत केली. त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत, असे नाईक यांनी सांगितले.

दोन सीसीटीव्ही कॅमेऱयांची व्यवस्था

आता सदर जागा स्वच्छ करण्यात आल्याने कोणी तेथे कचरा टाकू नये, असे आवाहनही नाईक यांनी केले आहे. या प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आपण स्वखर्चाने येथे दोन सीसीटीव्ही कॅमरे बसविले असून यापुढे कचरा टाकण्याचे प्रकार घडल्यास पालिकेला सीसीटीव्हीच्या आधारे संबंधितांवर कारवाई करणे शक्मय होईल, असे त्यांनी सांगितले.

सदर रस्त्यावरून जास्त वाहतूक होत नसते. याचा फायदा घेऊन येथील कचरा उचल केंद्र शेडजवळ कचरा टाकला जात असल्याने आपण सदर पेंद्र अन्यत्र हलविण्यास पालिकेला सांगितले आहे. लवकरच पालिका ते सोयीस्कर जागेवर स्थापित करेल, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी योगीराज कामत, पालिका अभियंता मनोज आर्सेकर, साहाय्यक अभियंता विशांत नाईक व पालिकेचे कामगार उपस्थित होते.

Related Stories

वेळगे पोटनिवडणुकीत सर्वेश घाडी विजयी

Amit Kulkarni

मायकल लोबोनी बेकायदा जमीन स्वतःच्या नावावर केली

Amit Kulkarni

गोव्याला अदिती फडतेकडून सुवर्ण; बॉक्सर्सची सुखद कामगिरी

Amit Kulkarni

आज उमेदवारांचे चित्र होणार स्पष्ट

Amit Kulkarni

फसवणूक करणाऱया संशयिताला अटक

Amit Kulkarni

गोव्यातील बेकारीचा दर वाढला

Amit Kulkarni
error: Content is protected !!