Tarun Bharat

यरमाळ रोडशेजारी साचले कचऱयाचे ढिगारे

Advertisements

कचऱयाची उचल वेळेत होत नसल्याने समस्या : कचराकुंड हटविल्याने नागरिकांची गैरसोय

प्रतिनिधी / बेळगाव

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिकेच्यावतीने स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याकरिता कचराकुंड मुक्त शहर ही योजना राबविण्यात येत आहे. याकरिता शहरातील कचराकुंड हटविण्यात आले आहेत. तसेच घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कचऱयाची उचल वेळेत होत नसल्याने यरमाळ रोडशेजारी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत.

शहरातील 48 वॉर्डांमध्ये घरोघरी जाऊन कचरा उचलण्याची मोहीम राबविण्यात येते. महापालिकेच्यावतीने विविध ठिकाणी कचऱयाची उचल केली जाते. पण यरमाळ रोड परिसरातील कचऱयाची उचल वेळेत केली जात नाही. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी असलेले कचराकुंड हटविण्यात आले आहेत. यामुळे कचरा कुठे टाकायचा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जात नाही. यामुळे नागरिक येथील कचराकुंडाचा वापर करीत होते. पण घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यात येत असल्याने कचराकुंड हटविण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

कचरा साचण्यास अधिकारीच जबाबदार

यरमाळ रोड परिसरातील कचराकुंड हटविल्याने कचरा टाकण्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याशेजारी व गटारीत कचरा टाकण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत. काही ठिकाणी कचरा गोळा करून जाळला जात आहे. याबाबत मनपा अधिकाऱयांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात कचऱयाची समस्या उद्भवण्यास मनपाचे अधिकारीच जबाबदार असल्याची टीका नागरिक करीत आहेत. येथील कचऱयाची उचल वेळेत करावी व समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related Stories

खानापुरात समितीच्या एकीसंदर्भात लवकरच पत्रव्यवहार

Amit Kulkarni

मनपा घेणार नविन फॉगिंग मशिन

tarunbharat

सामाजिक अंतर राखत साजरी झाली बकरी ईद

Patil_p

यशवंतपूर-पंढरपूर साप्ताहिक रेल्वेला जोडणार जादा डबा

Patil_p

महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवावा!

Amit Kulkarni

सीमाभागात हुतात्मा दिन गांभीर्याने

Amit Kulkarni
error: Content is protected !!