कुत्र्यांचा उपद्रव : नागरिक हैराण : स्वच्छता करण्याची मागणी
बेळगाव : बेळगाव- वेंगुर्ला मार्गावरील गांधी चौक ते यंदेखूट दरम्यान कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. रस्त्याच्या शेजारी कचऱ्याचा ढिगारा निर्माण झाल्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषत: भटकी कुत्री आणि जनावरे या कचऱ्यावर तुटून पडू लागली आहेत. त्यामुळे मार्ग भकास हलागली आहे. त्यामुळे या मार्गाला आता कचरा डंपिंग ग्राऊंडचे स्वऊप प्राप्त होऊ लागले आहे. कचरावाहू वाहनातून हा कचरा टाकला जात आहे की, स्थानिक नागरिक टाकत आहेत, याचा देखील मनपाने शोध घेणे आवश्यक आहे. बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर पश्चिम भागातील नागरिकांसह गोवा आणि कोकण भागातील नागरिकांची वर्दळ ाsऊ लागला आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कचरा टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे सौंदर्यदेखील धोक्मयात आले आहे. पश्चिम भागातून शहरात येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करतच प्रवेश करावा लागत आहे. रस्त्याच्या शेजारी प्लास्टिक, घाण, मृत जनावरे आणि इतर कचरा साचला आहे. दिवसेंदिवस समस्या गंभीर बनू असते. दरम्यान वाहने सतत ये-जा करत असतात. मात्र रस्त्याकडेला कचरा साचून असल्याने वाहनधारकांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे. शिवाय कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.