वार्ताहर /कणकुंबी
गोव्याहून गुलबर्गा जिल्ह्यातील चितापूर तालुक्मयातील वाडी येथील सिमेंट पॅक्टरीसाठी घेऊन जाणारा कचरावाहू ट्रक जांबोटीनजीक कलंडल्याची घटना मंगळवारी 27 रोजी मध्यरात्री घडली.
गोव्यातील म्हापसा साळेगाव येथून दररोज पाच-दहा ट्रक कचरा गुलबर्गा आणि लोकापूर येथे सिमेंट पॅक्टरीसाठी पाठवला जातो. या वाहनांपैकी काही वाहनांतील कचरा ताडपत्री न झाकता तसाच उघड्यावरून नेला जातो.
यापूर्वी अनेकवेळा जांबोटी, बैलूर क्रॉस, कणकुंबी अशा ठिकाणी ट्रकमधील कचरा रस्त्यावर पडून वाहतुकीला अडथळा, त्याचबरोबर नागरिकांना त्रासदायक बनला आहे.
मंगळवारी मध्यरात्री केए 32 सी 5121 हा बाराचाकी ट्रक गोव्यातून कचरा भरून घेऊन गुलबर्गा चितापूर तालुक्मयातील वाडी येथे जात असताना जांबोटी आळंबी पॅक्टरीजवळील वळणावर आला असता रस्त्याच्या बाजूला कलंडला. यामध्ये गाडीचा चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत.
परंतु अशा कचरावाहू वाहनांना पोलीस प्रशासनाने काही नियम घालून देणे गरजेचे आहे. पडत जाणाऱ्या कचऱ्याचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.