वृत्तसंस्था/ मुंबई
येथे सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या टी-20 प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात अष्टपैलू आणि ‘सामनावीर अॅश्ले गार्डनरच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 11 धावांनी पराभव केला. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात गुजरात जायंट्स चौथ्या स्थानावर आहे. या विजयामुळे त्यांचे प्ले ऑफचे आव्हान जिवंत राहिले आहे.
गुरुवारच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकात 4 बाद 147 धावा जमवल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा डाव 18.4 षटकात 136 धावात आटोपला.
गुजरात जायंट्सच्या डावामध्ये सलामीच्या डंक्लेने 5 चेंडूत 4 धावा जमवल्या. आणि ती पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाली. त्यानंतर वुलव्हार्ट आणि देओल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली. जोनासेनने देओलला भाटियाकरवी झेलबाद केले. तिने 33 चेंडूत 4 चौकारासह 31 धावा जमवल्या. अॅस्ले गार्डनर आणि वुलव्हर्ट या जोडीने गुजरातला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भर घातली. रे•ाrने वुलव्हार्टचा 19 व्या षटकात त्रिफळा उडवला. तिने 45 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारासह 57 धावा जमवल्या. हेमलता डावातील शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव जमवित झेलबाद झाली. गार्डनरने 33 चेंडूत 9 चौकारासह नाबाद 51 धावा झळकवल्या. गुजरातच्या डावात 1 षटकार आणि 19 चौकार नोंदवले गेले. दिल्लीतर्फे जोनासेनने 38 धावात 2 तर कॅपने 24 धावात एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरात जायंट्सच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज लवकर बाद झाले. कॅपने एकाकी लढत देत 29 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह 36, कर्णधार लॅनिंगने 15 चेंडूत 3 चौकारासह 18, कॅप्सेने 11 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह 22, रे•ाrने 17 चेंडूत 4 चौकारासह 25 धावा जमवल्या. शेफाली वर्मा 1 षटकारासह 8 धावा जमवत बाद झाली. शिखा पांडेने नाबाद 8 धावा केल्या. दिल्लीच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. गुजराततर्फे गार्डनर, गार्थ, तनुजा कंवर यांनी प्रत्येकी 2 तर स्नेह राणा आणि देओल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दिल्लीने या स्पर्धेत आतापर्यंत 6 सामन्यातून 8 गुण मिळवल असून गुजरातने 6 सामन्यातून 4 गुण नोंदवले आहेत.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंट्स 20 षटकात 4 बाद 147 (गार्डनर नाबाद 51, वुलव्हर्ट 57, डंक्ले 4, देओल 31, हेमलता 1, जोनासेन 2-38, कॅप 1-24, रे•ाr 1-25), दिल्ली कॅपिटल्स 18.4 षटकात सर्वबाद 136 (कॅप 36, रे•ाr 25, कॅप्से 22, लॅनिंग 18, शेफाली वर्मा 8, शिखा पांडे नाबाद 8, रॉड्रीग्ज 1, जोनासेन 4, गार्थ 2-18, कंवर 2-29, गार्डनर 2-19, स्नेह राणा 1-27, देओल 1-27).