वृत्तसंस्था/ इंडियन वेल्स
येथे सुरू असलेल्या बीएनपी पेरिबस खुल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत चिलीच्या नवोदित ख्रिस्टेन गॅरीने नॉर्वेच्या तृतीय मानांकित कास्पर रुडचा पराभव करत पुढील फेरी गाठली. त्याचप्रमाणे ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने पुढील फेरीत स्थान मिळविले आहे. महिलांच्या विभागात अमेरिकेच्या जेसीका पेगुला तसेच इटलीची सॅकेरी आणि स्वीसची टिचमन यांनी आपले विजय नोंदविले आहेत.
पुरुष एकेरीच्या सामन्यात ख्रिस्टेन गॅरीने कास्पर रुडचा 6-4, 7-6 (7-2) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. हा सामना दोन तास चालला होता. ब्रिटनच्या कॅमेरून नुरीने टॅरो डॅनियलचा 7-6 (5-7), 7-5, 6-2 असा पराभव केला. जर्मनीच्या ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हने तिसऱया फेरीत प्रवेश मिळविताना फिनलँडच्या रुसूक्होरीचा 7-5, 1-6, 7-5 असा पराभव केला.
महिलांच्या विभागात अमेरिकेच्या जेसिया पेगुलाने पोटापोव्हाचा 3-6, 6-4, 7-5 असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. या स्पर्धेत पेगुलाने सलामीच्या सामन्यात कॅमिला जॉर्जियाचा पराभव केला होता. इटलीच्या सातव्या मानांकित मारिया सॅकेरीने कॅलिनिनाचा 3-6, 6-2, 6-4 तसेच स्वीसच्या टिचमनने स्वीडनच्या पीटरसनचा 6-3, 3-6, 6-1 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत टिचमनने दुसऱया फेरीत नवव्या मानांकित बेनसिकला पराभूत केले होते.