ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Gas cylinder price hike नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करून ग्राहकांना झटका दिला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही.
व्यावसायिक वापराचा 19.5 किलो वजनाचा गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला आहे. दरवाढीनंतर दिल्लीत या सिलिंडरची किंमत 1769 रुपये झाली आहे. कोलकात्यात 1870, चेन्नईत 1917 तर मुंबईत हा सिलिंडर आता 1721 रुपयांना मिळेल. यापूर्वी 6 जुलै 2022 ला पेट्रोलियम कंपन्यांनी 19.5 किलोच्या सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली होती.
दरम्यान, मागील एका वर्षात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 153.50 रुपयांची वाढ झाली आहे.