Tarun Bharat

2022 चा शब्द ठरला ‘गॅसलाइटिंग’

अर्थ जाणून घेतल्यावर बसेल धक्का

2022 हे वर्ष लवकरच निरोप करणार आहे. अशा स्थिती या वर्षात काय घडले याचा आढावा घेतला जातोय. अशाच एका रंजक तथ्याबद्दल जगातील प्रख्यात प्रकाशक ‘मरियम वेबस्टर’ने माहिती दिली आहे. या प्रकाशकाने चालू वर्षात सर्वात चर्चेत राहिलेल्या शब्दाबद्दल माहिती दिली आहे. मरियम वेबस्टरकडून ‘गॅसलाइटिंग’ला वर्ड ऑफ द ईयर घोषित करण्यात आले आहे. या शब्दाच्या वाढत्या वापरामुळे तो चालू वर्षातील स्मरणीय शब्द मानला गेला आहे.

गॅसलाइटिंग शब्दाचा वापर मागील काही महिन्यांमध्ये खूपच वाढला आहे. परंतु 80 वर्षांपूर्वीच हा शब्द अस्तित्वात आला होता. परंतु आता या शब्दाचा संभाषणात अधिक प्रमाणात वापर केला जात आहे. मागील 4 वर्षांमध्ये याचा वापर वाढला असला तरीही 2022 मध्ये हा वर्ड ऑफ द ईयर ठरल्याचे मरियम वेबस्टरचे संपादक पीटर सोकोलोवस्की यांनी सांगितले आहे.

शब्दाचा अर्थ

हा शब्द गॅस लाइटच्या माध्यमातून 80 वर्षांपूर्वी म्हणजेच 1938 मध्येच अस्तित्वात आला होता. गॅस लाइट हा पॅट्रिक हॅमिल्टन यांनी लिहिलेले एक नाटक आहे, ज्यावर 1940 च्या दशकात दोन चित्रपट आले होते. गॅसलाइटिंगचा अर्थ कुणासोबत मनोवैज्ञानिक स्वरुपात दीर्घकाळापर्यंत खेळत राहणे आहे. संबंधित व्यक्तीला अशाप्रकारे भ्रमित करणे की तो स्वतःच्या विचार अन् स्वतःवरच संशय व्यक्त करू लागेल. त्याचा आत्मविश्वास अन् आत्मसन्मान इतका कमी होईल की तो समोरील व्यक्तीवरच निर्भर होईल. हा प्रकार राजनयिक आणि व्यावसायिक स्तरावरील कट देखील असू शकतो.

धोकादायक संज्ञा

सोप्या भाषेत गॅसलाइटिंग म्हणजे एखाद्या भोळय़ाभाबडय़ा व्यक्तीसोबत केला जाणारा मनोवैज्ञानिक धोका आहे. छळ करत त्यांच्या मेंदूवर नियंत्रण मिळविण्याचा हा प्रयत्न असतो. स्वतःचे अस्तित्व, आठवणी अन् विचारांवर संशय व्यक्त करण्यास यातून भाग पाडले जाते. नातेसंबंधात अनेकदा जोडीदार असेच करू लागतो. यामुळे समोरचा व्यक्ती मानसिकदृष्टय़ा शोषित होतो आणि कोलमडून पडतो. मनोवैज्ञानिकांच्या नजरेत हे कृत्य अत्यंत अपराधी आहे.

Related Stories

योशिहिडे सुगा होणार जपानचे पंतप्रधान

datta jadhav

गरजू देशांना 8 कोटी डोस देणार अमेरिका

Patil_p

अफगाण तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; 29 ठार

datta jadhav

‘फायझर-बायोएनटेक’ला WHO चे ग्लोबल ॲप्रूव्हल

datta jadhav

दहशतवाद पोसणाऱयांवर कारवाई व्हावी

Patil_p

गाझावरील हल्ल्यात एपीची इमारत उध्वस्त

Patil_p