Tarun Bharat

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत गौतमी पाटीलची उत्तुंग भरारी

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

विजापूर येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 33 किलो वजनी गटामध्ये मराठी विद्यानिकेतनची खेळाडू गौतमी पाटीलने रौप्यपदक मिळवित उत्तंग भरारी घेतली आहे.

विजापूर येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत पहिल्या कुस्तीत गौतमी पाटीलने धारवाडच्या कुस्तीपटूचा (10-0) अशा गुण फरकाने, दुसऱ्या सामन्यात हल्याळ कुस्तीपटूचा (6-2), उपांत्य फेरीत चिक्कोडीच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून अंतिम सामन्यात मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला. गौतमी नारायण पाटील ही इयत्ता आठवीची विद्यार्थिनी असून ती कंग्राळी या गावची आहे. कुस्तीचे धडे तिने गावच्या आखाड्यातूनच घेतले आहेत. दररोज सराव करून अनेक स्पर्धांमध्ये तिने यश संपादन केले आहे.

कुस्तीमध्ये ठसा उमटवणारी मराठी विद्यानिकेतनमधील पहिली विद्यार्थिनी म्हणून आज तिची ओळख निर्माण झाली आहे. तिला या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर यांच्याकडून 500 ऊपये रोख रकमेचे प्रोत्साहनपर भेट देऊन गौरवण्यात आले. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Stories

अग्निपथविरोधातील आंदोलकांना घेतले ताब्यात

Amit Kulkarni

कराटे विद्यार्थ्यांना बेल्ट वितरण

Amit Kulkarni

टिळकवाडीतील गुरुवारपेठजवळ कचऱयाची समस्या

Patil_p

बेळवट्टी भागात बसफेऱ्या वाढवा

Patil_p

केएलई अ संघ युजी क्रिकेट चषकाचा मानकरी

Amit Kulkarni

रेल्वेत चढताना निपाणीच्या जवानाचे अपघाती निधन

Rohit Salunke