वृत्तसंस्था/ लंडन
आयर्लंडचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आणि गोलरक्षक 20 वर्षीय गेव्हिन बॅझूनू प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया साऊदम्पटन फुटबॉल क्लबशी करारबद्ध झाला.
गेव्हिन बॅझूनू यापूर्वी प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या मँचेस्टर सिटी क्लबचे प्रतिनिधीत्व करीत होता. बॅझूनूने आयर्लंड संघाकडून 10 आंतरराष्ट्रीय सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. साऊदम्पटन क्लबने त्याच्याशी पाच वर्षांचा करार केला आहे. आयर्लंडतर्फे बॅझूनू याने आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी फुटबॉल कारकीर्दीला प्रारंभ केला. आयर्लंड संघाचा तो सर्वात कमी वयाचा गोलरक्षक म्हणून ओळखला जातो.