Tarun Bharat

गुजरात जायंटस्मध्ये गेलचे आगमन

Advertisements

वृत्तसंस्था/ अबुधाबी

लिजेंडस् लिग क्रिकेट स्पर्धेसाठी विंडीजचा सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचे गुजरात जायंटस् संघामध्ये आगमन झाले आहे. विरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंटस् संघाचा सामना कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर होणार असून या सामन्यात गेल खेळणार आहे.

जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये विंडीजचा ख्रिस गेल भारताचा विरेंद्र सेहवाग हे स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. टी-20 या क्रिकेटच्या प्रकारामध्ये सेहवाग आणि गेल यांच्या फटकेबाजीला रोखण्यासाठी गोलंदाजांना विशेष परिश्रम घ्यावे लागतात. टी-20 प्रकारात विंडीजच्या गेलने सर्वाधिक षटकार नोंदविले आहेत. त्याने 463 सामन्यात 1056 षटकार नोंदविले आहेत. उद्योगपती अदानी यांच्या मालकीच्या गुजरात जायंटस् संघाने स्पर्धेच्या गुणतत्क्यात चार सामन्यातून 5 गुणासह दुसरे स्थान मिळविले आहे. आता गुजरात जायंटस्ने पठाणच्या नेतृत्वाखाली भिलवारा किंग्जचा पराभव केला तर त्यांना गुणतक्त्यात आघाडीचे स्थान पुन्हा मिळविण्याची संधी राहिल.

Related Stories

फलंदाज प्रशिक्षकासाठी विक्रम राठोड पुन्हा रिंगणात

Patil_p

केएल राहुल टी-20 मालिकेतून बाहेर

Patil_p

न्यूझीलंडचा अष्टपैलू अँडरसन निवृत्त

Patil_p

दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नर पहिल्या कसोटीतून बाहेर

Omkar B

भारतीय महिला बुद्धिबळ संघाची विजयी घोडदौड कायम

Patil_p

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेला ‘बढती’

Patil_p
error: Content is protected !!