नवी दिल्ली/प्रतिनिधी
विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारी ते १ सप्टेंबर दरम्यान स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ जनतेवर अन्याय असल्याचे सांगत मोदी सरकारवर टीका केली. “मोदी सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे पण आता संपूर्ण देश या लुटीच्या विरोधात एकत्र येत आहे. GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे”, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.