मुंबई
गेट इस्टर्न (जीई) शिपिंग कंपनीचे समभाग 14 वर्षाच्या उच्चांकावर पोहचले आहेत. बीएसईवर कंपनीचा समभाग इंट्रा डे दरम्यान 5 टक्के वाढत 545 रुपयांवर पोहचला आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत कंपनीने 142 टक्के वाढीसह 457 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. त्याचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसला. समभाग 2022 मध्ये 83 टक्के इतका वाढला.