सावंतवाडी/ वार्ताहर-
हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला मोठं महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. श्रावणी शनिवार निमित्त माजगाव येथील दत्त मंदिरामध्ये संगीत मित्र मंडळाचा महाबली हनुमानाचे गुणगान करणारा “गीत हनुमंत” हा कार्यक्रम 30 जुलै 2022 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सादर होणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये विक्रम जाधव, विलास नाईक, एच.बी, सावंत, अजित सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अथर्व सावंत, जगन्नाथ सावंत हे गायक म्हणून सहभागी होणार आहेत. तर यांना हार्मोनियमची साथ एच.बी सावंत हे करणार असून तबलासाथ विवेकानंद सावंत आणि सोमेश्वर सावंत करणार आहे. या पूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मधुरा सावंत ह्या करणार असून सर्व रसिकांनी व भक्तांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन माजगाव दत्त मंदिरातर्फे करण्यात आले आहे.