Tarun Bharat

गेहलोत-पायलट आले एका व्यासपीठावर

राहुल गांधींची यात्रा राजस्थानात पोहोचण्यापूर्वी एकजुटीचे दर्शन

@वृत्तसंस्था  / जयपूर

राजस्थानात काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान पक्षासाठी दिलासा देणारी घटना घडली आहे. राजस्थानात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे एका व्यासपीठावर दिसून आले आहेत. गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी पायलट यांना ‘गद्दार’ संबोधिले होते. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.

राजस्थानात आम्ही सर्व एक आहोत, पायलट आणि मी एक आहोत. हेच या पक्षाचे वैशिष्टय़ आहे. राहुल गांधी यांच्या संदेशानुसार आम्ही सर्व जण एक आहोत असे उद्गार गेहलोत यांनी काढले आहेत.

पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक आणि भारत जोडो यात्रेवर आम्ही विस्तृतपणे चर्चा केली आहे. भारत जोडो यात्रेवरून पूर्ण देशात उत्साह आहे. आम्ही एकजूट असून राजस्थानात या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचे उद्गार सचिन पायलट यांनी काढले आहेत.

काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल सध्या जयपूरच्या दौऱयावर आहेत. त्यांनीच या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणल्याचे मानले जात आहे. राजस्थानात 5 डिसेंबर रोजी यात्रा दाखल होणार आहे. त्यापूर्वी दोन्ही नेते एकत्र येणे पक्षासाठी चांगला संकेत मानला जाऊ शकतो.

Related Stories

बचत योजनांवरील व्याज दर ‘जैसे थेच ठेवणार’

Tousif Mujawar

लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी अधीर चौधरी

Patil_p

दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसच्या बोगीला आग

Tousif Mujawar

3 विमानतळांची जबाबदारी अदानी समुहाकडे

Patil_p

राजकीय लाभासाठी सरकारकडून ध्रुवीकरण

Patil_p

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 27 पासून सुरु

Patil_p