Tarun Bharat

कराडमध्ये जिलेटिन स्फोटाचा कट उधळला

कराडच्या गजानन हौसिंग सोसायटीत राज्याला हादरवणारी घटना घडली. या परिसरातील एटीएम सेंटर जिलेटिन व डिटोनेटरचा वापर करून उडवून देण्याचा प्रयत्न असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी खबरदारी घेत मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत. एटीएम सेंटरचा परिसर सील करण्यात आला असून, अत्यंत काळजीपुर्वक परिस्थिती हाताळली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गजानन हौसिंग सोसायटीत राष्ट्रीयकृत बॅंकेचे एटीएम आहे. या एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे पुण्यातील टोळीने केला. मात्र रात्रगस्तीवरील पोलिसांच्या धाडसाने हा प्रयत्न फसलाच शिवाय पोलिसांनी जिवावर उधार होत जिलेटिनच्या स्फोटाचा कट उधळून लावल्याचे बोलले जात आहे. मात्र चोरट्यांनी तीन पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे मारून त्यांना जखमी केले. एका संशयिताला पकडून ठेवण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान जिलेटिनच्या वापराबाबत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी एटीएम बाहेर संशयास्पदस्थितीत अंथरलेली वायर, एटीएम मशीनमधे अडकवलेले डिटोनेटर यासह परिस्थिती पाहता एटीएम मशीन स्फोटाने उडवून देेण्याचा कट समोर येत आहे.

पोलिसांनी अत्यंत गांभिर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान या एटीेएम सेंटरच्या वरच्या मजल्यावर ब्रिलियंट अकॅडमी आहे. त्यातील सर्व विद्यार्थी बाहेर काढून इमारत रिकामी करण्यात आली आहे. सर्व परिसरात बॅरिगेंटींग करण्यात आले आहे. हा सर्व परिसर निर्मनुष्य करण्यात आला आहे. त्यामुळे जिलेटनचा स्फोट घडवण्याचा कट उधळल्याचे समोर येत आहे.

हेही वाचा : कराड पोलिसांची दरोडेखोरांशी झटापट, एकाला पकडले

Related Stories

साताऱयातील 7 शैक्षणिक संकुलात संविधानाचा जागर

Patil_p

सलग दुसऱ्या वर्षी देखावे नाहीत; गणेशोत्सव शांततेत उत्सव साजरी करण्याचा निर्णय

Archana Banage

सातारा : पंख फुटलेली मुलगी समाजमन शहाणे करेल

Archana Banage

सातारा बसस्थानक आले नाक धरा रे…!

Patil_p

लक्झरी बसचा ब्रेक फेल झाल्याने 5 वाहनांचा अपघात

datta jadhav

अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला साताऱ्यातून मिळावा

datta jadhav